दिनांक १ जुलै, श्रीगोंदा:
शिरूर, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील सर्व पॅथीच्या डॉक्टरांना एकत्र करून, डॉक्टर्स डे च्या निमित्ताने आधार मेडिकल फौंडेशन ची स्थापना करण्यात आली .
संघटना स्थापनेचा उद्देश सर्व पॅथीच्या डॉक्टरांना संघटित करणे आणि रुग्णहितासाठी विविध पॅथीच्या डॉक्टरांचा समन्वय घडवून आणणे हा आहे. विविध स्तरावर समाजाच्या हितासाठी व गरजू रुग्णांसाठी कामे करण्याचा मानस आहे. तीनही तालुक्यातून विविध गटांतून निवडल्या गेलेल्या सदस्यांची एक समिती तयार केली गेली असून, या समिती चे अध्यक्ष डॉ. स्वप्निल भालेकर , नेत्रतज्ज्ञ (शिरूर), डॉ. वी. बोरा (सचिव), डॉ. बाबा शिंदे (खजिनदार) व डॉ. बाळासाहेब मावळे हे संघटनेचे (उपाध्यक्ष) आहेत. याचबरोबर डॉ. पवन सोनावणे (शिरूर तालुका), डॉ. दादाराजे गिरमकर, डॉ. वैभव मचे (श्रीगोंदा तालुका ), डॉ. पठारे श्रीकांत, डॉ. बाळासाहेब घोगरे (पारनेर तालुका) हे सक्रिय पदाधिकारी म्हणूज काम पाहणार असल्याची माहिती प्रसिद्धीस मिळाली आहे.
संस्थेच्या स्थापनेत सिंहाचा वाटा असणारे डॉ. आकाश सोमवंशी (अस्थीरोगतज्ञ शिरूर) हे संस्थेच्या ट्रस्ट समितीचे अध्यक्ष असल्याचे प्रसिद्धी पत्रात नमूद करण्यात आले आहे. तिन्ही तालुक्यातील सर्व डॉक्टरांनी मिळून अशा प्रकारची संघटना निर्माण केल्याचे हे प्रथम उदाहरण आहे.
(स्रोत:आधार मेडिकल फौंडेशन मार्फत मिळालेली माहिती)
