दिनांक १ जुलै, श्रीगोंदा:
औरंगाबाद येथे ‘करोना’ संसर्गामुळे संपूर्ण शहर आणि औरंगाबाद जिल्हा संकटात सापडला असताना, औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातील परिस्थितीचे वस्तुनिष्ठ वार्तांकन दिव्य मराठी या दैनीकातून करण्यात आले. याचा राग येऊन औरंगाबाद महसूल व पोलीस प्रशासनाना दिव्य मराठी या वृत्तपत्रावर व त्यांच्या दोन प्रतिनिधींवर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी श्रीगोंदा तालुक्यात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने श्रीगोंद्याच्या नायबतहसिलदार डॉ. योगिता ढोले यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात करोना संसर्गाचा विळखा वाढत असताना सनदी अधिकाऱ्यांनी नागरिकांची काळजी करणे आवश्यक आहे. मात्र, औरंगाबादेतील काही सनदी अधिकाऱ्यांना स्वत:ची व स्वतः च्या कुटुंबाची काळजी वाटू लागली असल्याचे औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील परिस्थितीचे वस्तुनिष्ठ वार्तांकन दिव्य मराठी या दैनीकातून करण्यात आले. याचा राग येऊन औरंगाबाद महसूल व पोलीस प्रशासनाने दिव्य मराठी या वृत्तपत्रावर व त्यांच्या दोन प्रतिनिधींवर गुन्हे दाखल केलेे. या अधिकाऱ्यांच्या फालतू ‘इगो’ पेक्षा सर्वसामान्यांचे प्राण अधिक महत्त्वाचे आहेत. अधिकारी असोत वा नेते, पत्रकार असोत किंवा कार्यकर्ते,शेवटी महत्त्वाचे आहेत ते सर्वसामान्य लोक. यापैकी कोणताही घटक चुकीचे काही करीत असेल तर, माध्यमांनी त्यांना सुनावले पाहिजे.
सामान्य माणसे मरत असताना, त्याची चिंता करण्याऐवजी अधिकाऱ्यांना त्यांचा ‘इगो’ महत्त्वाचा वाटत असेल तर, या मूळ आकलनात काही तरी दोष आहे. त्यावर काम करावे लागणार आहे. ‘दिव्य मराठी’ वर गुन्हे दाखल करणारांना यांचे भान असायला हवे. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हा संविधानिक अधिकारांवर गदा आणण्याचा प्रकार असून, या प्रकरणाचा तालुक्यातील पत्रकारांनी निषेध नोंदवला आहे.
‘दिव्य मराठी’ वर गुन्हे दाखल करणाऱ्या औरंगाबाद महसूल व पोलीस प्रशासनाना श्रीगोंदे तालुका पत्रकार संघाच्या वतीने श्रीगोंद्याच्या नायब तहसिलदार डॉ. योगिता ढोले यांना निवेदन देऊन, निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पाचपुते, तालुकाध्यक्ष अंकुश शिंदे, माजी अध्यक्ष उत्तम राऊत, शिवाजी साळुंके, दादासाहेब सोनवणे, चंदन घोडके, योगेश चंदन, राजेंद्र राऊत, राजू शेख, यांच्या सह महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
(स्रोत:स्थानिक प्रशासनास दिलेले निवेदन)
