कोरोनात ही मरणार अनं पाणी नाही आले तरी मरणारच… त्यापेक्षा चांगले काम करुन मरू: आ.पाचपुते…!

दिनांक ८ मे श्रीगोंदा:

कुकडी पाण्याला स्टे देणे चुकीचे.. राज्य सरकार ने सक्षम वकिल देवुन बाजु मांडावी. अन्यथा तीव्र आंदोलनाचा आमदार पाचपुतेंचा इशारा..

कुकडीच्या नियोजित आवर्तनाला खोडा घालण्यासाठी कोर्टात याचीका दाखल केली आहे. पण, या स्टेमुळे शेती बरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बननार आहे. याला जबाबदार कोण ? असा सवाल करीत आमदार बबनराव दादा पाचपुते यांनी राज्य सरकारने दिनांक १२ मे रोजी कोर्टात सक्षम वकिल देवुन ही स्थगिती उठवावी. अन्यथा, तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा दिला आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

कुकडीच्या नियोजित ९ मे च्या आवर्तनाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. आवर्तन १२ मे पर्यंत लांबणीवर पडले आहे. या पार्श्वभूमीवर आ.बबनराव पाचपुते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कुकडीच्या पाण्याला स्थगिती देणे हे चुकीचे आहे. असे स्थगिती मिळाली तर, शेती बरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बननार आहे. याला जबाबदार कोण ? असा सवाल पाचपुते यांनी उपस्थित केला आहे. पाणी सोडण्यासाठी स्वतंत्र अधिकार असणारी कालवा सल्लागार समिती आहे. त्या अधिकारात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता. पिंपळगाव जोगा धरणातुन पाणी काढण्यासाठी पाईपलाईनसाठी २५ कोटी रुपये निधी खर्च करण्याचा निर्णय झाला आहे. येडगावमध्ये पाणी आल्याशिवाय खालील कार्यक्षेत्रात पाणी जात नाही. ही वस्तुस्थिती आहे. पण, पाऊस पडल्यानंतर पाणी वाया जाते. गेल्यावर्षी ११ टीएमसी पाणी वाया गेले. याला जबाबदार कोण? याचाही विचार करणे गरजेचे आहे.

Even if there is no water in the corona, we will die.

कोर्टात जाण्याची सवय लागली. तर, सिंचन होणारच नाही. म्हणुन, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचेशी दुरध्वनीवरुन चर्चा केली आहे. दिनांक १२ मे रोजी सक्षम वकिल देवुन बाजु मांडावी व स्थगिती उठवावी अशी मागणी केली आहे. यासंदर्भात कुकडीचे अधिक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांच्याशी चर्चा केली आहे. जर १२मे ला पाणी सुटले नाही. तर, तीव्र आंदोलन करु ! यासंदर्भात पारनेर चे आमदार निलेश लंके, कर्जत जामखेड चे आ रोहित पवार यांच्या बरोबर चर्चा केली आहे. असे पाचपुते यांनी सांगितले.

कोरोनात ही मरणार व पाणी नाही आले तरी मरणारच… त्यापेक्षा चांगले काम करुन मरू:आ.पाचपुते…!
सध्या सर्वजन कोरोनाच्या संकटातुन जात असतांना हे पाण्याचे संकट आले आहे. कोरोनात मरण्यापेक्षा शेतकऱ्यांना पाणी मिळवुन देण्यासाठी स्वतः पाणी सोडण्यासाठी जावु आमचा जीव गेला तरी, चालेल त्यामुळे पाण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार पाचपुते यांनी दिला आहे.

स्रोत:(प्रसिद्धीपत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading