मी एक स्वप्न पाहिलं.! डॉ.राजेंद्र भारुड (IAS),भाग ३२.

होतो. समोरची मुलं पोट धरून हसत होती आणि त्या कथेच्या विनोदात माझे चुकणारे इंग्रजी उच्चार अधिकच भर घालत होते. माझ्या संपूर्ण सादरीकरणादरम्यान मी सतत विचार करत होतो, की समोरची मुलं माझ्या नक्कलेवर हसत आहेत की उच्चारांवर. सर्वांचं सादरीकरण संपल्यानंतर स्पर्धेचा निकाल जाहीर होणार होता. सर्वाचीच उत्कंठा शिगेला पोहोचली होती. आम्ही श्वास रोखून कथाकथनाच्या निकालाची वाट पाहत होतो. आणि जेव्हा निकाल लागला तेव्हा तर मी थक्कच झालो. इंग्रजी उच्चारांच्या एवढ्या चुका करूनही त्या स्पर्धेत माझा चक्क तिसरा क्रमांक आला. मला पुरस्कार देताना सर म्हणाले, की तू बारीक आणि लव माणसाचा अतिशय उत्कृष्ट अभिनय केलास, म्हणूनच तुला हे बक्षीस मिळत आहे. माझं बालमन त्यावेळी आनंदानं फुलून आलं. शालेय जीवनात मिळणारे असे छोटे – छोटे पुरस्कारच आपल्याला भविष्यात काहीतरी मोठं आणि भव्यदिव्य करण्याची प्रेरणा असतात. शिवाय अशा कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धांमधून आपलं व्यक्तिमत्त्वही आकार घेत जातं, मुलं शाळेत छान रमतात व त्यांना अभ्यासाची गोडीही लागते. या सर्व गोष्टींचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला.

https://bit.ly/bspmycityshrigonda

आज मला लक्षात येतं, की या सर्व गोष्टींचा किती सकारात्मक परिणाम मनावर होतो. म्हणूनच मी जेव्हाही लहान मुलांना काही वेगळं व चांगलं करताना बघतो, तेव्हा आवर्जून त्यांचं कौतुक करतो आणि त्या चिमुरड्यांचे चेहरे आनंदाने फुलताना बघतो. त्यांनाही हेच अपेक्षित असतं.

I had a dream! Dr. Rajendra Bharud (IAS), Part 32.

‘नवोदय’मध्ये अनेक उत्सव साजरे केले जायचे. पण त्या सर्वांमधे सर्वांत जास्त धमाल असायची ती गणेशोत्सवाची. नवोदयमधला गणेशोत्सव आम्ही एखाद्या कौटुंबिक उत्सवासारखा साजरा करायचो. त्यात केवळ आम्ही मुलंच नाही, तर आमचे सर्व शिक्षक व इतर कर्मचारीसुद्धा मोठ्या उत्साहाने भाग घ्यायचे. काही मुलं उत्साहाने फूल व प्रसाद वाटायचे. माझ्यासाठी ही सर्व नवलाईच होती. कारण आमच्या भिलाटीत किंवा इंदिरानगरात मी कधीच कोणत्या प्रतिष्ठित व्यक्तीसोबत असे प्रसंग अनुभवले नव्हते. सामोड्याच्या शाहू वस्तीतील किंवा इतर पांढरपेशा लोकांच्या वस्तीतील गणेशोत्सवात मी कधीही सहभागी झालो नव्हतो. पण इथे ‘नवोदय मध्ये मी प्रत्येक उत्सवात मोठ्या उत्साहाने भाग घेत असे. कारण इथे कोणत्याही उत्सवात सामील व्हायला मला माझी जात कधीच आडवी आली नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मलाही इथे कोणामध्ये मिसळायला कधीच कमीपणा वाटला नाही…

क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.! या पुस्तकातुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading