कोरोना प्रादुर्भावा दरम्यान सामान्यांना येणाऱ्या अडचनींकडे राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाने स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधले..

दिनांक ८ मे,श्रीगोंदा:

राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संदिप उमाप यांनी श्रीगोंद्याचे तहसीलदार प्रदीप पवार व श्रीगोंदा नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांना कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी नागरिकांना प्रभागनिहाय लसीकरण सुविधा उपलब्ध करून द्यावेत. तसेच, पेट्रोल पंपावर पेट्रोलची सुविधा ११ वाजेपर्यंत पुरण्यात यावी, लसीकरण नोंदणीची अट रद्द करून, लसीकरण केंद्रावर नागरिकांचे नावे नोंदवून त्यांची शासनातर्फे ऑनलाईन नोंदणी करण्यात यावी. अश्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार पवार यांना देण्यात आले.

https://bit.ly/bspmycityshrigonda

श्रीगोंदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांना कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने प्रभागनिहाय विषाणू नाशक फवारणी (सॅनिटायझेशन) करण्यात यावे, असे निवेदन देण्यात आले. सध्या कोरोना विषाणू प्रादुर्भाव काळ सुरू असून, श्रीगोंदा शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. बरेचसे रुग्ण घरामध्ये विलगिकरणामध्ये आहेत. त्यामुळे शहरातील संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. तरी, नगरपालिकेच्या हद्दीमध्ये तातडीने प्रभागनिहाय विषाणूनाशकाची फवारणी करण्यात यावी. असे दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी शासनामार्फत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. श्रीगोंदा शहरामध्ये लसीकरनासाठी एकच केंद्र असून, लसीकरनाला प्रचंड गर्दी होत आहे. याठिकाणी नागरिकांना तासन – तास रांगेत उभे राहावे लागत आहे. आत्ता उन्हाळ्याचे दिवस असुन, वृद्ध नागरिकांना उन्हाचा शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. लसीकरणासाठी नागरिक एकाच ठिकाणी गर्दी करत असल्यामुळे लोकांमध्येही कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढलेला आहे. त्यामुळे नगरपालिकेने प्रभाग निहाय लसीकरण केंद्र उभारून नागरिकांचे लसीकरण पार पडावे. यामुळे गर्दी कमी होऊन संसर्गाचा धोका टळू शकेल. Statement of the Social Justice Department of the Nationalist Congress Party to the local administration regarding the difficulties faced by the common people during the outbreak of Corona virus.

शहरामध्ये टाळेबंदी आहे. शहरातील पेट्रोलपपं अत्यावश्यक सेवा वगळता बंद आहेत. त्याचा परिणाम रोजचे दूध विक्रेते, भाजीपाला वाहन करणारे तसेच, सामान्य नागरिकांवर होत आहे. अत्यावश्यक गरज असणाऱ्यांसाठी पेट्रोल उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. घरात एखादी व्यक्ती आजारी पडली. तर, दवाखान्यात नेण्यासाठी देखील पेट्रोल अभावी गाडी उपलब्ध होत नाही. तरी, या सर्व बाबींचा विचार करून, पेट्रोल पंप सकाळी ११.०० वाजेपर्यंत चालू ठेवण्यात यावा.

लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणीची अट टाकलेली असून, बरेच नागरिकांना सदर नोंदणी प्रक्रियेची माहिती नाही. अनेकांकडे तर अँड्रॉईड मोबाईल नाहीत व सध्या लॉकडाऊन असल्यामुळे ऑनलाईनची कामे करणारे शॉपही बंद आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रावर आलेल्या नागरिकांची माहिती ऑफलाईन पद्धतीने गोळा करून, नंतर ती प्रशासकीय कर्मचाऱ्यांमार्फत ऑनलाईन भरावी, जेणेकरून नागरिकांना या ऑनलाईन लसीकरणाच्या किचकट प्रक्रियेचा समाना करावा लागणार नाही. या विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे (तालुकाध्यक्ष) संदिप उमाप यांनी तहसीलदार प्रदीप पवार यांना दिनांक ७ मे रोजी दिले आहे.

निवेदन सादर करतांना राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागचे (शहराध्यक्ष) राहुल बागे, (कार्याध्यक्ष) जितेंद्र पाटोळे, (शहर उपाध्यक्ष) निखिल पाटोळे, (शहर उपाध्यक्ष) मानव जाधव, (तालुका सचिव) शैलेंद्र सांगळे, निलेश घोडके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

स्रोत:(निवेदन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading