५१ फाद्यांचा कुटुंबवृक्ष..भावडी येथील आगळेवेगळे शेतकरी कुटुंब.

‘हम दो हमारे दो’ च्या जमान्यात संयुक्त कुंटूब पध्दती लोप पावली आहे . अशा परिस्थितीत भावडी येथील भोस पाटील यांच्या कुटुंबाचा वृक्ष मोठा झाला आहे त्याची पाळंमुळं खोलवर रूझली आहेत या कुंटुबात सामंजस्य, विश्वास, आपुलकी व एकीची भावना आहे. नैसर्गिक, कौटुंबिक अथवा दुष्काळ यासारखे कसले वादळ आले तरी ५१ सदस्यांची एक फांदीही हालत नाही. उलट दरवर्षी नवी पालवी फुटते. त्यामुळे वटवृक्षाप्रमाणे सदैव बहरलेला असतो.

श्रीगोंदा शहरापासून पुर्वेला १६ किमी अंतरावर भावडी हे सुमारे १ हजार २०० लोकसंख्येचे छोटे गाव आहे. कै. साहेबराव भोस पाटील हे मुख्य फांऊडर त्यांना बन्सीलाल, कांतीलाल , दादासाहेब व सुखदेव ही चार मुले गेल्या वर्षी कांतीलाल भोस यांचे अपघाती निधन झाले. यामुळे कुंटुबावर आघात झाला. शांतीलाल भोस हे भावडी सहकारी सोसायटीचे १६ वर्षे चेअरमन होते. भरत भोस हे हनुमान सहकारी सोसायटीचे चेअरमन आहेत तर अॅड. सुनील भोस हे नागवडे साखर कारखान्याचे संचालक आहेत. तर इंजिनिअर झालेली स्वाती भोस हीने उपसरपंच पद भुषविले आहे. डॉ. सारिका, डॉ. राजेंद्र, डॉ. महेंद्र, शहाजी, भरत, श्रीराम, आत्माराम ही कर्तबगार पिढी प्रगतीच्या यशाची शिल्पकार ठरत आहे.

या कुंटुबांची श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील भावडी कोकणगाव रुईगव्हाण शिंदे या चार गावात सुमारे २४० एकर जमीन आहे. शेती आणि विविध व्यवसायातून सुमारे दोन कोटींचा वार्षिक उलाढाल होते. उलाढालीचा ताळेबंद ठेवण्यासाठी दर दिवाळीला खतावणी पुजन केले जाते. एकीचे बळ काय असते आणि एकत्रीत कुंटूबातुन प्रगती कशी साध्य करता येते हे भोस कंपनीकडे पाहिले की लक्षात येते. सध्या उस, डाळिंब, केळी, हनुमान सीताफळ, चिक्कु, केशर आंबे, सोयाबीन, उडीद, कांदा यांनी भोस पाटलांचा मळा फुलून गेला असुन प्रत्येक जण आपल्या क्षेत्रात जबाबदारीने काम करतो या कुंटुबांचे कारभारी म्हणुन शांतीलाल भोस काम करतात ते दरवर्षी प्रगतीचा आलेख कुंटूबां समोर मांडतात सन २०१३ पर्यंत कर्जाच्या ओझ्याखाली होते पण त्यानंतर एकीचे विश्वासातून हे कुंटूब कर्जमुक्त झाले आणि चौफेर प्रगती केली आहे. त्यामुळे विसाव्या शतकातील भोस कुंटूबांची मुलखावेगळे कुंटूब म्हणून निश्चित नोंद होणार आहे.

संदेश

आमच्या आजोबांनी एकत्रीत राहण्याचा सल्ला दिला होता तो शब्द प्रमाण मानुन आमचे कुंटूब एकत्रीत आहे प्रत्येकजण आपल्या कामगिरीतून कुंटुबाच्या प्रगतीचा घटक बनला आहे. ज्याला जे पाहिजे ते गरजेनुसार पुरविले जाते. आमच्या कुंटूबातील प्रत्येकाच्या गरजा कमी आहेत. शिवाय मेहनत करण्याची तयारी मोठी आहे. त्यामुळे प्रगती झाली आहे. या यशाचा मानकरी कुंटूबातील सर्व सदस्य आहेत मी फक्त निमित्त आहे. शेतकरी माणसांनी एकत्र राहिले पाहिजे आणि प्रामाणिकपणे काम केले तर कुंटूबाची गरुड झेप अटळ आहे. एकत्रीत कुंटूबाला प्रत्येकावर कामाचा भार विभागातून जातो त्यामुळे ताण कमी होतो. शांतीलाल भोस,भावडी..

स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)
प्रस्तुत माहिती पुस्तक प्रकाशन वेळेची आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading