फकिरा.अण्णा भाऊ साठे.(भाग १६).

फकिरा..

। ” बटी लावीत होते . एक बटी लावू आणि काम संपवू – दोन लावू आणि पुरं करू तीन बट्या लावून सुटी करू , असं म्हणत ते काम उरकीत होते . पेढाची पोरं रडकुंडीला आली होती .

-आणि निवडुंगाच्या पलीकडे गुरं चारायला गेलेली पोरं ओरडत घराकडे येत होती . म्हशीच्या पाठीवर बसून गात होती : ‘ तू ऐक , नंदाच्या नारी ! …

‘ एवढ्यात एक वाटसरू आला . तो एका ठेंगू घोड्यावर बसला होता . त्याच्या मानानं ते घोडं अगदीच खुजं होतं . त्यामुळं वरच्या त्या माणसाचे पाय जवळ जवळ जमिनीला लागत होते . एखाद्या गाढवावर बसावं , तसा तो बसला होता . डोकीला लाल रंगाचा पटका , अंगात जाड कापडाची बंडी , जरीकाठी धोतरानं कंबर बांधून त्यानं हातात पल्लेदार दांड्याची कुन्हाड घेतली होती . त्याचा रंग काळा होता . त्यानं आपल्या बेतात असलेल्या मिश्यांना पीळ भरून नाक फेंदारलं होतं . त्याच्या तांबरट डोळ्यांत राग दिसत होता . त्याला पाहून पोरांचा गलका बंद झाला . ती आपल्या सांकेतिक भाषेत एकमेकांना सांगू लागली .

” ए , आरील ठिकालाय , रं- ‘

” आरं , आरील नव्हं – झिंमक ! ” दुसरं केकाटलं आणि तिसरा चिरकला ,

‘ आलवसरू नका- ”

” लगेच चौथं म्हणालं , ” पेडू द्या .

त्या पोराचं ते बोलणं ऐकून तो इसम थांबला . आवाज नरम करून तो “म्हणाला ,

कुनाचं रं , तुमी ? ”

‘ आमी ? – कुरवाड्याचं . ” एका पोरानं चटकन खोटं सांगून टाकलं .

तो इसम चकित होऊन म्हणाला , ” मग ही रं , कसली भाषा बोलताय ? “

” ही पोरांची- ”

” काय चोरांची ? ‘ ‘ त्या हुशार माणसानं पोरांना चिमटा काढण्याचा प्रयत्न केला , पण बनलेली ती पोरं वठली नाहीत . नाकाचा मुरठा करून एक पोर म्हणालं ,

” तुम्ही किवंडं हायसा ? ”

” न्हाय बा – मला ऐकू येतं की . ”

” मग पोरांची म्हनताना तुमी चोरांची कशी ऐकली ? ” वाटसरूवर डाव उलटीत आणला आणि ते पुढे म्हणालं , ” चोराच्या मनात- ‘

हे ऐकून सारी पोरं हसली . माळ हास्यानं भरला . हिरमुसला वाटसरू म्हणाला , “ ए थट्टा करू नगा . त्या फकिराचं घर कंचं रं ?

” हा प्रश्न ऐकून पोरांना पुन्हा संशय आला . त्यांनी एकमेकांना डोळ्यांनी खुणावलं . एक पोर म्हणालं , “ तुमास्नी कंचा फकिरा पायजी ? ”

वाटसरू पुन्हा पेचात पडला . बाबजी मांगाचा झिंग्या निवडुंगाच्या बेळ्यातून उंदराप्रमाणे निघून फकिराकडे पळाला .

” ” हतं किती फकिरा हायती ? ” त्या वाटसरूनं पुष्कळ विचार करून विचारलं आणि पोरं म्हणाली ,

” आवं , हतं चार फकिरा हायती .

त्या पोरांच्या बोलण्याचा रोख त्या वाटसरूच्या डोकीत आला . ही सारी मांगाची पोरं असून , ती आपल्याला गाढवात काढीत आहेत , हे लक्षात येऊन तो म्हणाला , ” त्या चार फकिरांच्या बापांची नावं रं काय ?

” एक काळं हडकुळं पोर पुढे होऊन म्हणालं , ” मी सांगतो – एकाचं शिग्या , एकाचं झिंग्या , एकाचं शिरग्या नि एकाचं मिरग्या- ‘ ही नावं ऐकून सारी पोरं पोट धरून हसू लागली . काही लोळू लागली . वाटसरू भांबावून गेला . इतक्या वेळात त्या बेळ्यातून फकिरा माळाला आला . झिंग्या लंगोटी नीट करीत दूर उभा राहिला . सारी पोरं गप्प झाली आणि फकिरा म्हणाला , ” कोन गाव , पाव्हनं ? ”

” आम्ही तिकडं काळगाव – कुमजंचं . “

” कुनाकडं आलाय ? “

‘ फकिराकडं .”

‘ काय काम हाय ? “

” मला कुमजंच्या सत्तूनं पाठवलंय .

” सत्तूचं नाव ऐकून फकिरा चमकला . तो म्हणाला ,

” सत्तूकडं मला तुम्ही दिसला न्हाय कवा . ‘

” मी गोंदा गोंधळी . मी गावोगाव फिरत असतो . सत्तू माझा मैतर हाय . त्येनं मला फकिराकडं पाठवलंय- ”

” मग मीच त्यो फकिरा . बोला , काय काम हाय ? ए पोरानू , जावा तुमी आता .

पोरं गुरांना हाकीत गेली . गोंधळी घोड्यावरून उतरला आणि म्हणाला .

“ सत्तूवर बाका प्रसंग गुदरलाय , म्हनून त्येनं मला तुमच्याकडं पाटवलंय . “

‘ कसला प्रसंग ? ”

‘ जर तुम्ही हातपाय हलवलं , तरच सत्तूचा जीव वाचनार हाय -न्हाय तर त्येची आशा न्हाय- ‘ गोंधळी खिन्न होऊन म्हणाला .

फकिरा एकाएकी गंभीर झाला . तो म्हणाला , ‘ कसला प्रसंग – सांगा तरी ! ”

‘ चला -सांगतो .

” ते दोघे घराकडे निघाले . आपला एक मित्र संकटात आहे , हे ऐकून फकिरा बेचैन झाला . त्याची ती हकीकत ऐकण्यासाठी तो आतूर मनानं चालू लागला .

गोंधळी चालता चालता म्हणाला ,

” ही पोरं कुनाची ? ‘

” ” मांगांची . ‘

” मला सांगितलं , कुरवाड्याची म्हनून .

” ” खोटं सांगितलं त्येंनी .

” हातं फकिरा किती हायती ? “

” एकच – मी . ”

” मला त्येनी चार सांगितलं .

‘ फकिरा हसला .

” बरं , ती बोलत्यात बी निराळं . ‘ ‘ गोंधळी पुटपुटला . “

कसं ? ” फकिरानं विचारलं .

‘ आरील म्हंजी काय ? ”

” कुरवाडी .

“ वरावला म्हंजी ? ” ‘

आला . ही भाषा आमच्या जातीची हाय . ”

” ही भाषा का म्हनून बोलता ? “

” सरकारी अंमलदारास्नी कळू नये , म्हनून . ‘

दोघे घरात आले . कुमजंत घडलेला प्रकार गोंधळी सांगू लागला “

बहाद्दूरवाडीच्या दादा पाटलानं काल सत्तूला अटक केलीया . साहेबाचा तसा हुकूमच होता . आनी जेवढा म्हनून सरकारइरूद मानूस हाय , तेवढा सारा कैद करायचा त्येचा बेत हाय ! ”

” सत्तूला कशी अटक झाली ? ” फकिरानं विचारलं .

” एका न्हाव्याकडं दाढी करीत व्हता . इतक्यात पन्नास लोकांनी त्येला अटक करून मळीला बांधून ठेवलाय . उद्याच ते सातारला निघनार हायती . ह्या अटकंमागं समदं पाटील हायती . ” गोंधळी म्हणाला आणि फकिरानं विचारलं ,

” मला काय निरोप हाय सत्तूचा ? ”

“ निरोप हाय की , ‘ माझ्यावर हत्यारानं उपकारा . जर जगलो , तर ते उपकार केडीन !

” हा सांगावा ऐकून फकिराच्या वर्मी बाण लागला . तो उद्विग्न होऊन “म्हणाला

तुम्ही इतका उशीर का केला ? ”

” काय करू ? वाटाच बंद व्हत्या . आता तुम्ही घाई करा , न्हाय तर वारनेचा खोरा एका मर्दाला मुकंल ! ”

” दादा पाटलाची किती मानसं हायती ? ”

” पन्नास . पर हत्यारबंद- ”

” हत्याराचं नाव नका मला सांगू . मानसं किती ? ”

” पन्नास . “बाडीत ” मग निघू या ! ” फकिराला घाई झाली . “

दोघंच ? ‘

” ते का ? मानसं जमवीत जायचं . ” फकिरा साधूला हाक मारून म्हणाला , ” सत्तूला सोडवायचा . मानसं काढा नि निधा !

” कडुसं पडलं आणि सर्व गडी जमले . मुरा , बळी , ईश्वरा , किसन , भिवा , घम्या असे पंचवीस जवान तयार झाले . गबऱ्यावरचं खोगीर आवळीत फकिरा म्हणाला , ” घमाडी , तू चिचनीला जा नि पिराला सांग . म्हनावं , दुपारी बहादूरवाः ये . जा तू ! एकजन जाऊन हरी नि रामाला घिऊन या ! ” सर्व तयारी करून तो राधाकडे गेला . तिच्या पायांवर डोकं ठेवून म्हणाला , ” रागावू नगं . माझा मैतर मरनाच्या दादंत हाय . त्येला सोडवाया जातू . बाबा , थोरले आई ! – ‘ एवढंच बोलून त्याच्या पायांना न्याय मिठी घातली .

दोलती मग कापऱ्या आवाजात म्हणाला ,

‘ जा – पर जपून ! ”

” कवा येनार ? ” राधा आसू आवरीत म्हणाली .

” मी उद्या दीस बुडताना नक्की यीन ! “

‘ आम्ही तवर भाकरी खानार न्हाय ! ” राही म्हणाली .

” माझी काळजी करू नक्षा . सांजला घरात हाय मी . ” फकिरा उत्तरला .

सारी तयारी झाली . गबऱ्या खेकाळला नि निघाला . राधाला हुंदका आला . ती मनातल्या मनात गबऱ्याला म्हणाली ,

” बाबा , माझ्या फकिराला टाकून एकटा येऊ नगं . दोगं या . न्हाय तर- ‘

‘त्यावेळी फकिराचा घोडा दुडक्या चालीवर नाचत बहादूरवाडीची वाट चालत होता आणि फकिराच्या डोळ्यांपुढं कुमजेचा सत्तू मरणाचा कानोसा घेत मळीला बसलेला होता. त्याच्या ओठांवर बहाद्दूरवाडी एवढेच शब्द नाचत होते. सूर्योदयाच्या आत बहादूरवाडी गाठायची. मग पुढं कसा वेढा घालायचा, सत्तूला मुक्त कसं करायचं आणि सूर्यास्ताच्या आता आईला कबूल केल्याप्रमाणं परत कसं फिरायचं, याचा विचार करीत तो निघाला होता.

कुमजं गावाला वारणा नदीनं एक पल्लेदार वळसा घेतला होता. त्या वळणदार, अगदी वारणेच्या कुशीत कुमजं वसलं होतं. काजळाच्या वडीसारखी सुपीक जमीन नि वारणेचं पाणी यामुळे त्या खोऱ्यात कुमजं हे कुबेराची अमरावती मानलं जात होतं. धरणी, पाणी नि कष्ट यांचा निसर्गानं सुंदर संगम घडवला होता.

क्रमशः…
स्रोत:(अण्णा भाऊ साठे यांच्या फकिरा कदंबरीतून)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading