अपंगत्वावर मात करून फुलविला शेतमळा..

एरंडोली येथील मागासवर्गीय कुंटूबातील गौतम दगडू शिंदे या तरुणाने सन २००० मध्ये बी. एस्सी. ॲग्री पदवी संपादन केली आणि स्नायू कमकुवत झाल्याने अपंगत्व आले. अशा परिस्थितीमध्ये गौतमने जीवनात हार न मानता वडिलोपार्जित आडीच एकर शेती डाळिंब, आंब्याची बाग फुलविली आहे. या बहरलेल्या बागाकडे पाहून गौतम लाख मोलाचे आत्मिक समाधान व जगण्यासाठी हिम्मत मिळाली.

दगडू शिंदे हे पाटबंधारे विभागात नोकरीस होते. राजेंद्र, गौतम, सविता व तनुजा ही चार मुल राजेंद्र मुंबईत सिनीअर कॉलेज मध्ये प्राध्यापक, गौतमने धुळे येथील शासकीय कृषी महाविद्यालयात बी.एस्सी. ॲग्री पदवी संपादन केली. तनुजा प्राथमिक शिक्षिका तर सविता मुंबईत नोकरी करते दगडू शिंदे यांनी मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून बळ दिले. गौतम हा बी.एस्सी. ॲग्री झाला आणि स्नायू कमकुवत झाल्याने अपंगत्व आले. अशा परिस्थितीत गौतमने एम.पी.एस.सी.ची परिक्षा दिली आणि कृषी सहाय्यक झाले. थोरला भाऊ मुंबईत नोकरी करत असल्याने गावाकडची शेती कोण करणार अशा परिस्थितीत गौतम ने सुट्टीच्या दिवशी गावी जाऊन डाळिंब व आंब्याची लागवड केली. त्यासाठी चुलत बंधू बाळासाहेब शिंदे मदत आणि टेक्निकल मार्गदर्शन डाळिंब तज्ञ रमेश हिरवे यांनी केले. नोकरीत जेवढे पैसे मिळतात तेवढेच पैसे शेतीतून मिळविण्याची किमया गौतम यांनी जिद्दीच्या बळावर साध्य केली आहे.

गौतम शिंदे शासकीय कामात तत्पर असतात. घरी महामानव बाबा आमटे वसतिगृहातील विकास पाटील हा गौतम शिंदे यांची बाहेरची कामे पाहतो. तसेच सर्व प्रकारची संध्याकाळ सकाळची मदत विकास करतो. त्यामुळे गौतम यांचा सख्या भावापेक्षा जादा जीव बसला आहे एखाद्या दिवस विकास आला नाही तर गौतम यांना तो दिवस सुना सुना जातो. आई जनाबाई ह्या गौतम यांची देखभाल करतात गौतमने हसतमुख स्वभावाने सर्वाशी मैत्रीचे धागे घट्ट केले आहेत.

स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)
प्रस्तुत माहिती पुस्तक प्रकाशनाच्या वेळेची आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading