महाराजा कॉलेजमधील पाच कुस्तीपटूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड..

दिनांक ३१ ऑगस्ट २०२४, श्रीगोंदा:

दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथे २९ व ३० ऑगस्ट २०२४ रोजी आयोजित जिल्हास्तरीय शालेय १७ आणि १९ वर्षे वयोगटातील मुले व मुलींच्या कुस्ती स्पर्धेत महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या कुस्ती खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या स्पर्धेत त्यांनी प्रेक्षणीय कुस्त्या करत जिल्हास्तरावर यश मिळवले. त्यापैकी पाच खेळाडूंनी प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी आपली निवड सुनिश्चित केली आहे.

या यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक संजय डफळ, संतोष जाधव आणि क्रीडा संचालिका कल्पना बागुल यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:

१७ वर्षे वयोगट:
१. गायत्री हराळ – ४३ किग्रॅ – द्वितीय 
२. संदेश डफळ – ८० किग्रॅ – द्वितीय 
३. संदीप गायकवाड – ७१ किग्रॅ – प्रथम 

१९ वर्षे वयोगट:
१. सोनाली दरेकर – ५५ किग्रॅ – तृतीय 
२. समीक्षा टोणगे – ६५ किग्रॅ – प्रथम 
३. कामिनी देविकर – ७२ किग्रॅ – प्रथम 
४. श्रुतिका पवार – ७६ किग्रॅ – प्रथम 
५. अशोक पालवे – ७९ किग्रॅ – प्रथम

सर्व खेळाडूंचे महाविद्यालयात विशेष सन्मान करण्यात आला. विकास समिती, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव जरे साहेब, उपप्राचार्य प्रा. साळवे सर, उपप्राचार्य मखरे सर, पर्यवेक्षक रत्नाकर झिटे सर, जिमखाना प्रमुख प्रा. अहीवळे सर, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी या खेळाडूंना अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

जाहिरात..

Leave a Reply