दिनांक १७ मार्च,अहमदनगर:
माजी केंद्रीय जहाज वाहतूक मंत्री आणि भाजपा अहमदनगर दक्षिणचे माजी खासदार दिलीप गांधी यांचे आज निधन झाले आहे. दिल्लीतील खासगी रुग्णालयात उपचार घेत असतांना त्यांचे निधन झाले. ते ६९ वर्षाचे होते. गांधींना कोरोनाची लागण झाली होती. काल त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
दिलीप गांधींची राजकीय पार्श्वभूमी:
अहमदनगर महानगरपालिकेत त्यांनी नगरसेवक पदापासून राजकीय भूमिकेची सुरुवात केली. नगरपरिषदेत ते भा ज पाचे नेते झाले. अहमदनगर महानगरपालिकेचे १९८५ साली उपाध्यक्ष झाले. भाजपच्या अहमदनगर जिल्हा संघटनेत सरचिटणीस, सहसचिव आणि अध्यक्ष अश्या प्रमुख पदांवर त्यांनी काम केले. (Former MP Dilip Gandhi passes away)

केंद्रीय जहाज वाहतूक मंत्रालयाची धुरा:
दिलीप गांधी १९९९ मध्ये अहमदनगर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. जानेवारी २००३ ते मार्च २००४ कालावधीत ते भारत सरकारच्या जहाज वाहतूक मंत्रालयात मंत्री झाले. पुढे २००४ साली तुकाराम गडाख (राष्ट्रवादी काँग्रेस) या उमेदवाराकडून गांधींना पराभव स्वीकारावा लागला.
मोदी लाटेचा मोठा फायदा:
गांधी अहमदनगरमधून २००९ साली लोकसभेवर निवडून गेले. लोकसभा २०१४ च्या निवडणूकित ते दोन लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी झाले होते. नरेंद्र मोदिंच्या पुढाकारात भारतीय जनता पक्षाने देशभरात मोठे यश मिळवले होते.
गांधींचे तिकीट कट डॉ. विखेंना उमेदवारी:
गांधींचे उमेदवारी डावलून राधाकृष्ण विखे पाटीलांचे पुत्र डॉ.सुजय विखे पाटील यांना २०१९ मध्ये उमेदवारी देण्यात आली होती. (Former MP Dilip Gandhi passes away)
स्रोत:(गूगल)
