किल्ले धर्मवीरगड ते रायगड पहिला “धर्मवीर” रथयात्रा पालखी सोहळा यशस्वी..

दिनांक १३ फेब्रुवारी २०२४, श्रीगोंदा:

महाराष्ट्रातील गडकिल्ले अभ्यासपूर्ण भटकंती, संवर्धन व श्रीगोंदे तालुक्यातील ऐतिहासिक वारसा जतन करणाऱ्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराच्या वतीने यावर्षी प्रथमच किल्ले धर्मवीरगड ते किल्ले रायगड अशी रथयात्रा आयोजन केले होते.

दिनांक १० व ११ फेब्रुवारी रोजी ही रथयात्रा दोन दिवसांत २५० किमी. प्रवास करून किल्ले रायगड येथिल महादरवाजा येथे पोहचली. महादरवाजा येथेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची भेट घडून आली.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन, सहभागी सर्वांना शिवदुर्गचे अध्यक्ष राजेश इंगळे यांनी गडाची माहिती सांगितली. श्रीगोंदे आणि रायगड ऋणानुबंध उलगडून सांगितला.

दोन्ही राजांच्या संबंधाने श्रीगोंदा व पेडगाव इथे सहा प्रमुख ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. इथे इतिहास घडलाय. इतिहासाला कलाटणी देणारे प्रसंग येथे घडले आहेत. इतिहास जपणे आपले कर्तव्य आहे म्हणून, जाणार रथ यात्रा आयोजन केले आहे. अशी माहिती रथयात्रेचे प्रमुख नियोजक आणि शिवदुर्गचे उपाध्यक्ष डॉ चंद्रशेखर कळमकर यांनी दिली.

शिवदुर्गचे उपाध्यक्ष डॉ चंद्रशेखर कळमकर यांचे मार्गदर्शनाखाली धर्मवीर रथयात्रा दिनांक १० फेब्रुवारी रोजी पहाटे ३० शिवदुर्ग शिलेदार मावळ्यांच्या नियोजनात श्रीगोंदयाचे ग्रामदैवत संत शेख महंमद महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन, किल्ले धर्मवीर गडाच्या शौर्य स्तंभास मानवंदना देऊन मार्गस्थ झाली आहे. शिवदुर्गवारी मध्ये १०१ जणांनी सहभाग नोंदवला. सहा वर्षांचा आदित्य भरत खोमणे व अमीर शेख यांनी फक्तं २५ मिनिटांत महादरवाजा पर्यंत सर्वात अगोदर किल्ला सर केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून श्रीगोंदेकरांचे इमान रायगडाच्या मातीशी राहिला आहे. श्रीगोंदे तालुक्यांतील एकमेव किल्ला धर्मवीरगड. पांडे पेडगावचा किल्ला, बहादूरगड होय.

श्रीगोंदेकरांचे इमान नेहमीचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाशी होते. म्हणूनच राजधानी रायगडाच्या एका टोकाला छत्रपती शिवाजी महाराजांनी “श्रीगोंदे टोक” नाव दिले होते. श्रीगोंदे आणि रायगड ऋणानुबंध जपणे श्रीगोंदेकरांचे कर्तव्य आहे.
शिवदुर्गवारी पालखी सोहळा स्वयंसेवक शिलेदार मावळे म्हणून संकेत नलगे, गोरख नलगे, महेश नलगे, ऍड.गोरख कडूसपाटील. प्रा.भरत खोमणे, डॉ चंद्रशेखर कळमकर, गणेश कुदांडे, अक्षय गायकवाड, अमोल बडे, अतुल क्षिरसागर, सागर घाडगे, सचिन भोसले, विकास जगताप, विकास आढाव, अभिजीत आढाव, सागर आढाव, नवनाथ आढाव, अक्षीका इंगळे, अमोल गावडे, प्रथमेश मोरे, सुनिल दत्तात्रय मोरे, आशीष जगताप, संगीता इंगळे, तारा चांदगुडे, रुक्मिणी कुदांडे, दिलीप गायकवाड, शंभू गायकवाड यांनी जबाबदारी पेलली.

शिवदुर्ग धर्मवीर पालखी सोहळ्याचे/रथयात्रेचे गावोगावी उत्स्फूर्त स्वागत.
काष्टी येथे सुप्रभात ग्रूप काष्टी डॉ.कोल्हटकर व त्यांच्या सर्व सहकारी डाॅक्टर टीम ने स्वागत केले. सेनापती नेताजी पालकर यांचे वंशज गणेश पालकर, सचिन पाचपुते, कृष्णा नागवडे, शरद भोसले, शिवदुर्ग रणरागिणी सीमाताई पाचपुते यांनी सर्व शिलेदार मावळयांचे स्वागत करून सर्वांच्या नाष्टयाची व्यवस्था केली.

सांगवी फाटा येथे विवेक कडदेशमुख यांनी आपल्या परिवारासह रथयात्रेचे स्वागत केले. पुण्यातील तरुणाईने ठीक ठिकाणीं सिग्नलवर थांबवून पालखीचे दर्शन घेतले. आस्थेने पालखी सोहळ्याची चौकशी केली. आगळ्या वेगळ्या तरुणांना स्फूर्ती देणारा सोहळ्यास शुभेच्छा दिल्या.

रायगडवर पालखी नेत असताना अनेक तरुणांनी राजांच्या पालखीस खांदा दिला. चितदरवाजा येथे मोठ्या प्रमाणावर शिवप्रेमी जनसमुदाय उपस्थित होता. सर्वांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पालखी सोहळ्यास मानवंदना दिली आणि कौतुक केले.

सहा महिन्यापासून प्रयत्न करूनही कागदोपत्री पूर्तता करूनही केंद्रीय पुरातन विभागाने गडावर पालखी नेण्यास परवानगी दिली नाही. म्हणून, महादरवाजा येथे पालखी सोहळा समाप्त झाला.

नंतर सर्वजण गडावर जावून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन परतले. परतीच्या मार्गावरील प्लॅस्टिक गोळा करून गडाखाली आणले. चित्त दरवाजा येथे महाड येथील प्लॅस्टिक संकलित करणाऱ्या व्यक्तींकडे प्लॅस्टिकने भरलेल्या १४ गोण्या सुपूर्द केल्या.

आमची सुखाची व्याख्या वेगळी.
अनेकजण फक्त गड फिरायला जातात. पण आम्ही सलग सात वर्ष रायगड समजुन घ्यायला जात आहोत. इतिहास काळापासून असणारा श्रीगोंदे आणि रायगड ऋणानुबंध जपण्यासाठी यावर्षी प्रथमच धर्मवीर पालखी सोहळा आयोजित केला होता. त्यास मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आम्ही छत्रपती संभाजी महाराजांसाठी काहीतरी करू शकलो. याचं मोठं समाधान आहे.

डॉ.चंद्रशेखर कळमकर- उपाध्यक्ष शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading