#श्रीगोंदा.. कोकणगावात चार मोर मृतावस्थेत..

दिनांक १० फेब्रुवारी(कोकणगाव, श्रीगोंदा):

तालुक्यातील कोकणगाव शिवारात उल्हास दिनकर शिंदे यांच्या शेतात चार मोर मृत अवस्थेत आढळले बाबत अधिकृत माहिती मिळाली आहे. या घटनेने बर्ड फ्लू च्या पाश्र्वभूमीवर सामान्यांमध्ये संभ्रम उडाली आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

कोकणगाव, आढळगाव परिसरात मोराची संख्या मोठी आहे. अलिकडच्या काळात ओढ्या नाल्यावर अतिक्रमण वाढले असून, झाडे झुडपे कमी झाली आहेत. त्यामुळे मोरांची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत कोकणगाव शिवारात चार मोराचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू पिकांवरील विषारी किटक नाशक मुळे, शिकाऱ्याच्या जाळ्यात आडकल्याने झाला कि, बर्ड फ्लूमुळे झाला याबरोबरच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नमूद मोर मृत्यू प्रकरणाचा गांभीर्याने तपास करणे आवश्यक आहे.

स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading