शीर नसलेल्या मृतदेह तपास प्रकरणात,पोलिसांचे शर्तीचे प्रयत्न सुरु..

दिनांक १० फेब्रुवारी(टाकळी कडेवळीत,श्रीगोंदा):

तालुक्यातील टाकळी कडेवळीत एका पुरुषाचा शीर नसलेला मृतदेह कुत्र्यांनी उकरून काढला होता. दिनांक ८ फेब्रुवारी याबाबत माहिती समोर आली. क्रूर पध्दतीने खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हा मृतदेह पुरला असण्याची प्राथमिक शक्यता यावरून वर्तवण्यात आली.

https://bit.ly/bspmycityshrigonda

या प्रकरणात पोलिसांच्या तपासाची चक्रे फिरू लागली असून, अद्यापही शीर नसलेल्या मृत देहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे शर्तीचे प्रयत्न सुरु असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत गावापासून काही अंतरावर निर्मनुष्य असणाऱ्या माळरानावर दि (८ फेब्रुवारी) रोजी सायंकाळी कुत्र्यांनी एक मृतदेह उकरून काढला असल्याची माहिती आजूबाजूच्या स्थानिक रहिवाशांच्या लक्षात आल्याने, त्यांनी श्रीगोंदा पोलिसांशी संपर्क करून ही माहिती दिली होती. यानंतर (तहसीलदार) प्रदीप पवार, (पोलीस निरीक्षक) रामराव ढिकले हे घटनास्थळी दाखल झाले होत. स्थानिक प्रशासनाच्या उपस्थित पुरलेला मृतदेह बाहेर काढला. हा मृतदेह पुरुषाचा असून, त्याचे मुंडके घटनास्थळी आढळुन आले नाही.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार नमूद इसमाच्या अंगात निळ्या रंगाचा शर्ट असून, राखाड्या रंगाची पॅन्ट होती. मयत पुरुष उंच असून मजबूत शरीरयष्टीने आहे. मृतदेहाचे शीर घटनास्थळी आढळून आले नसल्याने, हा घातपाताचा प्रकार असण्याची अधिक शक्यता बळावत आहे.

घटनास्थळी फॉरेन्सिक लॅब, अंगुलीमुद्रा तज्ञ् आदींना पाचारण करण्यात आले होते. याबाबत पोलिसांच्या तपासाची सूत्रे योग्य दिशेने वाटचाल करत असल्याचेही समजत असून, लवकरच या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश येण्याची शक्यता आहे. तसेच, या व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. हा मृतदेह खून करून पुरला का ? या मृतदेहाला इथे आणून का आणि कोणी पुरले? खुन झाला असेल तर, कोणत्या कारणातून झाला? या मागचे कारण व या सर्व प्रश्नांची उकल पोलीस यंत्रना लवकरच करणार आहे.

मात्र, मृतदेहाच्या अंगावरील काही पुराव्यांच्या अनुषंगाने पोलिसांनी केलेल्या तपासानुसार शेजारील जिल्ह्यातील संबंधित काही लोक या तपासादरम्यान पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले होते. मात्र, या प्रकरणात शीर नसलेल्या धडाची ओळख पटविण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे. शीर नसलेल्या मृत देहाची ओळख पटेना. परंतु, त्यासाठी पोलिसांचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.

स्रोत:(मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading