#श्रीगोंदा..तहसील कार्यालयातील वेळकाढू मग्रूर अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निषेधार्थ आमरण उपोषण.

दिनांक १० फेब्रुवारी, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तहसील कार्यालयातील कर्मचारी तसेच काही कनिष्ठ अधिकारी हे सामान्य लोकांच्या कामाकडे दुर्लक्ष करीत मोबाईल व सहकाऱ्यांसोबत गप्पा मारण्यात तासन तास व्यस्त असल्याबाबत अनेकांच्या तक्रारी समोर आलेल्या आहेत. लोकांना कामाव्यतिरिक्त रेंगाळत ठेवत त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचे प्रकारही निदर्शनास येत आहेत. नमूद कर्मचारी व काही अधिकारी कर्तव्यावर असतांना व्यस्त असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीगोंदा तालुका सामाजिक न्याय विभागाचे संदीप उमाप यांनी तक्रारी निवेदन देत, सत्याग्रही मार्गाने आमरण उपोषण करीत, या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे डोके ठिकाणावर आणणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे. तसेच, याबाबतचे प्रसिद्धीपत्र त्यांनी प्रसारमाध्यमांना ही सुपूर्त केले आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंदा तहसील कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत असल्याने, श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचे निवदन आज (जिल्हाधिकारी) राजेंद्र भोसले व (तहसीलदार) प्रदीप पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संदिप उमाप यांनी दिले आहे.

त्यांच्या निवेदनामध्ये ते म्हणाले आहेत की, सर्व सामन्य नागरिकांना एका कामासाठी तहसीलदार कार्यालयात सारख्या चकरा माराव्या लागत आहेत. मात्र, वरिष्ठ अधिकारी तसेच, वरिष्ठ कर्मचारी हे कामे सोडून गप्पा मारण्यात दंग असल्याचे दिसून येते आहे. तरी, हा प्रकार तात्काळ थांबवावा व सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळवून द्यावा. कर्मचारी आणि अधिकारी यांना आपण लोकसेवक असल्याचा विसर पडल्याचे जाणवत आहे. तरी, याबाबत तात्काळ योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल इशारा उमाप यांनी दिला आहे.

याची दक्षता न घेतल्यास सदर काळात कोणताही गैरप्रकार घडल्यास त्यास तहसीलदार जबाबदार राहतील. असेही ते म्हणाले आहेत. सदर निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुका (कार्याध्यक्ष) गोरख घोडके, (तालुका सचिव) शैलेंद्र सांगळे, (तालुका उपाध्यक्ष) दीपक ससाणे, (सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष) राहुल बागे, (शहर कार्याध्यक्ष) जितू पाटोळे, (शहर उपाध्यक्ष) मानव जाधव, (शहर उपाध्यक्ष) निखिल पाटोळे, कार्तिक घोडके, निकेश ससाणे यांच्या सह्या आहेत.

स्रोत:(संदिप उमाप यांनी प्रसिद्धीस दिलेले निवेदन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading