दिनांक १० फेब्रुवारी, श्रीगोंदा:
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्या वतीने भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा मिराताई आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ११ फेब्रुवारी २०२१ रोजी पंचशिल विद्या मंदिर, सिध्दार्थनगर अहमदनगर येथे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.

या प्रसंगी राष्ट्रीय महासचिव जगदीश गवई, सचिव वसंत पराड, भिकाजी कांबळे, अशोक केदारे, भदंत बी. सारीपुत्त व श्रामणेर संघ तसेच विभागीय सचिव अनिकराव गांगुर्डे जिल्हा अध्यक्ष भगवंतराव गायकवाड आदि उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हा सचिव सतिश ओहोळ ( सर) यांनी दिली.
सकाळी ११ ते ५ या वेळेत बौद्ध धम्मातील विविध विषयावर प्रबोधन, धम्मधेसना. धम्म पुस्कार वितरण, स्मरणिका प्रकाशन सोहळा, श्रामणेर शिबीर समारोप आदि कार्यक्रम होतील. सर्वांना उपस्थित रहाण्याचे आवहान प्रशांत चव्हाण (सर) राजु ओहोळ ,नवनाथ रामफळे, आनंद घोडके, रावसाहेब आदिनी केले आहे.
स्रोत:(सतीश ओहोळ सर)
