वांगदरीत १५०० कुटुंबांना आरसेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी कोरोना प्रतिबंधात्मक गोळ्यांचे निशुल्क वाटप..

दिनांक ९ मे (वांगदरी,श्रीगोंदा):

भाजपा तालुकाध्यक्ष संदिप नागवडे यांच्या संकल्पनेतून आज वांगदरी येथील १५०० कुटुंबांना ‘आरसेनिक अल्बम ३०’ या होमिओपॅथी कोरोना प्रतिबंधात्मक गोळ्यांचे निशुल्क वाटपाची सुरुवात आमदार बबनरावजी पाचपुते यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नितीन खामकर, डॉ.सचिन जाधव, डॉ.दत्तात्रय नागवडे भाजपा तालुकाध्यक्ष संदिप नागवडे, डॉ.संजय नागवडे, डॉ. शिरिष चोरमले, सरपंच पती दगडू आप्पा सोनलकर, सर्व आरोग्य सेविका, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

या गोळ्या आरोग्य सेविका व अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत गावातील सर्व कुटुंबांना निःशुल्क घरपोहोच पुरविण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading