श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील ११ रस्त्यांसाठी १६५३.९१ लक्ष रुपयांचा निधी मंजूर. :(भाजपा तालुकाध्यक्ष) संदीप नागवडे..

दिनांक २८ ऑक्टोबर, श्रीगोंदा:

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील ११ रस्त्यांच्या कामास मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती श्रीगोंदा तालुका भाजपा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी माध्यमानां दिली आहे.

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी केलेल्या सततच्या प्रयत्नामुळे मतदारसंघातील ११ रस्त्यांसाठी १६५३.९१ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून, लवकरच या रस्त्यांची कामे सुरु होणार असल्याची, माहिती भाजपा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=nxtgen.mycity

कामा संदर्भात माहिती देताना नागवडे यांनी पुढे म्हटले आहे की, श्रीगोंदा तालुक्यातील निंबवी ते पांडवगिरी रस्ता (किमी १.५०) रु. १०९.३०, रामा – ६७ ते अरणगाव लबडे वस्ती रस्ता (किमी ३.४०) रु. २०७.०५ लक्ष, प्रजिमा ५६ ते विसापूर ते शिंदेवाडी रस्ता (किमी २.५०) रु.१८९.५५ लक्ष, पिंपळगाव पिसा ते विष्णूची वाडी रस्ता (किमी १.५०) १०९.२५ लक्ष, येळपणे ते गावडेवाडी रस्ता (किमी १.८०) रु. १२६.२७ लक्ष, बेलवंडी कोठार ते गायरान वस्ती रस्ता (किमी १.९०) रु.११६.५२ लक्ष, घोटवी ते रानमळा रस्ता (किमी २.२०) रु.१४३.३३ लक्ष, अजुनज ते माळवाडी रस्ता (किमी १.४०) रु. १११.१२ लक्ष, असे एकूण श्रीगोंदा तालुक्यासाठी १११२.३९ लक्ष रूपये मंजूर झाले आहेत. तसेच, श्रीगोंदा मतदारसंघातील नगर तालुकयातील आगडगाव ते मोरदरा रस्ता (किमी १.३०) रु.८९.९४ लक्ष, कौडगाव ते राजणी ते गोरेवस्ती, भेंडेकर वस्ती रस्ता (किमी ५.५४) रु.३८२.१६ लक्ष, गुणवडी ते राळेगण रस्ता (किमी १.१०) रु.६९. ४२ लक्ष असे एकूण ५४१.५२ लक्ष रुपये मंजूर झाले असल्याची माहिती संदीप नागवडे यांनी दिली.

या रस्त्यांच्या नियमित देखभाल दुरुस्तीसाठी ही ५ वर्षेपर्यंत ची निधीची तरतूद करून ठेवलेली आहे. मतदारसंघातील विकास कामांसाठी आमदार बबनराव पाचपुते हे सतत प्रयत्न करून, निधी आणण्याचे काम करत आहेत. त्यामुळे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाच्या वैभवात भर पडणार आहे. सौर ऊर्जा प्रकल्पाची अनेक कामे मंजूर झालेली असून, उर्वरित कामासांठी शासन दरबारी प्रयत्न सुरु आहेत. तसेच डिंभे ते माणिकडोह बोगद्यासाठी हि आमदार पाचपुते यांचा शासन दरबारी प्रयत्न सुरु असल्याचे, भाजपा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी सांगितले.

स्रोत:(संदीप नागवडे यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading