मागासवर्गीय दफन/स्मशान भुमीतील अतिक्रमण काढण्याची मागणी.अन्यथा आंदोलन!.

दिनांक २८ ऑक्टोबर (कोळगाव,श्रीगोंदा):

तालुक्यातील कोळगाव येथे गट नंबर १२३ मधिल मागसवर्गिय समाजातील उजगरे बांधवांच्या दफन भुमित सामाजातील पूर्वजांचे मृतदेह दफन असून, याठिकाणी काही लोकांनी दडपशाहीने समाजातील कोणालाही विचारात न घेत, अतिक्रमण करून, उतखन्न केले आहे. तसेच, त्यावर अनाधिकारशाहीने भिंतिचे बांधकाम केले आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=nxtgen.mycity

नमूद ठिकाण मागासवर्गीय समाजाचे श्रद्धास्थान व आशास्थान आहे. यावर काही प्रस्थापित लोकांनी जेसीबीच्या सहाय्याने उतखन्न करून, बांधकाम केले आहे. या कृत्यामुळे समाज बांधवांच्या भावना दुखविण्याचे काम आमच्या गैरहजेरीत येथील प्रस्थापित लोकांनी केले असल्याचा आरोप कोळगाव येथील मागासवर्गीय समाज बांधवांनी केला आहे. जेसीबीने उत्खनन केल्याने आमच्या पूर्वजांच्या मृत अवशेषांची अवहेलना होत आहे. असे निवेदनात म्हटले. या सर्व प्रकारचा कोळगाव येथील समाज बांधवांनी निषेध केला असून, आगामी काळात स्थानिक प्रशासनाने या प्रकरणात लक्ष न घातल्यास व्यापक आंदोलन करणार असल्याचे पीडित बोलत आहेत.

याबरोबरच पळसा नदीची हद्द निर्धारीत करुन, पुर नियंत्रण रेषा निर्धारित करीत, या मागासवर्गिय दफनभुमीची जागा सरकारी मोजनी प्रमाणे मोजुन देणे, कंपाउंड अतिक्रमण मध्ये आहे ते हटविण्यात यावे, महाराष्ट्र शासनाची एस. टी. बस दफन भुमित वळवु नये तसेच, नमूद अतिक्रमण धारक व बांधकाम करणाऱ्यांवर सनदशीर मार्गे कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी अहमदनगर यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. लवकरच तालुक्यातील फुले, शाहू, आंबेडकरी कार्यकर्त्यांसोबत बैठक करून, आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सन्मान उजगरे यांनी मध्यमांना सांगितले आहे.

स्रोत:(सन्मान उजगरे यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading