दिनांक १० एप्रिल २०२४, श्रीगोंदा:
आज आयोजीत संवाद मेळाव्यात जिल्हा, तालुका कार्यक्षेत्रातुन पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित झाले.. यावेळी ॲड. विठ्ठल काकडे, ॲड. बाळासाहेब पवार, राजु गोरे, मुकुंद सोनटक्के, गोपाळ मोटे, भाऊसाहेब खेतमाळीस, शांताराम भुजबळ, राजेन्द्र घोडके, संजय आनंदकर, बाळासाहेब शेलार, विक्रम शेळके, ॲड.महेंद्र शिंदे, संतोष जठार, गणेश लगड, शाहूराजे सिपलकर, विलास भैलुमे, अरविंद कापसे, सलीम शेख, नाना शिंदे, अजिम जकाते सह शेकडो महिला बांधवांसह संवाद मेळाव्यास उपस्थित होते. अनील बोरुडे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते.
या मेळाव्यात सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नावर चर्चा करण्यात आली. कुकडीच्या पाण्याभोवती फिरणारं राजकारण, साकळाई सिंचन प्रकल्प बाबत
अण्णांनी उभारलेले आंदोलनं, याबरोबर अनेक राजकीय, सामाजिक जडणघडनीं नमूद केल्या.. वाटचालीत प्रस्तापित राजकारण्यांचा हस्तक्षेप झाला .. मात्र, नेत्यांनी तालुक्यातील सामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर, सुविधांवर, पाण्यावर, मुलभूत बाबींवर सकारात्मक चर्चा कधीच केली नसल्याचे नमूद केले.
घनःश्याम शेलार:
मेळाव्यातील उपस्थित सर्व पदाधिकऱ्यांचे मतं आणि भावना जाणून घेऊन आज निर्णय घेणार आहे. प्रक्रियेत सक्रिय झाल्यावर आपल्या कार्यक्षेत्रातील परस्थिती आणि ईतर ठिकाणची परस्थिती वेगळी जाणवली. बागायत आणि जिरायत भाग अशी तफावत कॉलेज जीवनात जाणवायची. मात्र, पुढे फोटोग्राफीतून सामाजिक भान जाणवलं आणि पत्रकारितेत सामाजिक लिखाण केले. पुढें लोकाभिमुख प्रश्न निर्माण झाले.. त्यावर राजकीय वाटचाल सुरू केली. यातुन सर्व गोष्टींची पार्श्वभूमी लक्षात आली.
सहकारी कारखान्याच्या माध्यमातून शेतीतील आणि शेतकऱ्यांचे गुण दोष समोरं येतं गेले.. राजकीय आवड हायस्कूलच्या जीवनातच सुरु झाली .अनेक सामाजिक, राजकीय आठवणी यावेळी सांगितल्या.. कुकडीच कामं माझ्या मुळेच पूर्णत्वाला गेल्याचे त्यांनी सांगितले. आयुष्यातलं पहिलं आंदोलन शैक्षणिक क्षेत्रात केले. छ्त्रपती कॉलेज बचाव आंदोलन केले. सहकाऱ्यांच्या बरोबरीने अनेक प्रश्नांवर, सुविधांवर, मुलभूत अधिकारांसाठी आग्रह केला. तालुक्यातील पाणी, वीज प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहिलो. राजकीय समीकरण आणि निवडणुका सह सामाजिक संघर्ष त्यांनी या मेळाव्यात नमूद करीत आज पर्यंतच्या वाटचालीवर दृष्टीक्षेप टाकला.
संत शेख महमंद बाबांची शपथ घेत घनःश्याम शेलार कधी विकला नाही.. अशी कबुली दिली. माझी अनेकदा बदनामी झाली. सामान्य माणसाला बदनाम करने सोपे असते. प्रस्थापितांची पोरं कधीच बदनाम होत नाहीत. हे बोलतांना ते भावना विवस झाले.. अनेक समाज हिताची कामं केली. कौतुक फार झालं पण पदरात काही पडल नाही. आरोप, प्रत्यारोप झाले, खोटी बदनामी झाली, पण प्रामाणिक राहिलो.. असेही अण्णांनी नमूद केले.
पराभव झाला मात्र, लगेच तालुक्यातील सामाजिक प्रश्नांसाठी सक्रीय झालो. ज्यांना निवडून दिलं, त्यांनी तालुक्यातील प्रश्न जैसे थे ठेवलेत.. आणि सर्वजण आमदार व्हायला निघालेत..! त्यांनी शेतकऱ्यांच्या उशाचे पैसे दिलेत का..? गाळलेल्या उसाचे पेमेंट चौदा दिवसांत देणे बंधनकारक असताना तीनीही कारखान्यांनी ते दिलेत का..? असा सवाल करून, व्याजासहित शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करत आहे. असे सांगितले.
भारत राष्ट्र समितीच्या पदाचा राजीनामा:
त्यांनी दिलेली राजकीय जबाबदारी परिपूर्ण पार पाडली, सामान्यांसाठी, साकळाई, कुकडी, घोड योजना मांडल्या, भोसा खिंड प्रकल्प, मार्गी लावला, तरी, मी कोणाच्या पैश्याला लाजिनदार राहिलो नाही.. KCR यांनी महाराष्ट्राचं स्ट्रक्टर तयार करण्याची जबाबदारी दिलती. तेथे विकासच मॉडेल होत म्हणुन BRS मध्ये गेलो. यामुळे पक्षांतराची भुमिका घेतली. इतर बहुतेक ठिकाणी माझ्या सारख्या प्रामाणिक माणसाची कदर झाली नाही.. BRS सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सकारात्मक प्रतिसाद देऊ शकत नसल्याने BRS चा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.
याप्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार काँग्रेसचे नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे ठरविले व पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी हेमंत ओगले, मनोहर पोटे, दिपक भोसले, संपत म्हस्के, सुनीता ताई दरोडे, प्रशांत दरेकर, कैलाश शेवाळे, बाबासाहेब गुंजाळ, निशांत लोखंडे, संजय लाकुडझोडे, स्मितल वाबळे, काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात:
घनःश्याम शेलार आणि त्यांच्यासमवेत काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत केले. अनेकवेळा संधी हुकत गेली.. यासाठी मलाच भगत व्हावं लागलं.. असे नमूद केले. आता ते योग्य ठिकाणीं आलेत. जनता अण्णांसोबत राहिलं असे सांगितले. राज्य आणि केंद्रातील परस्थिती यावेळी थोरातांनी नमूद केले. महापुुरूषांच्या विचारप्रवर्तक असलेली राज्य घटना राहिलं का..? असा सवाल यावेळी उपस्थित केला. कोनी मोठ्याचं लेकरू आहे.. संसाधन आहेत.. परंतु , सामान्य माणसासाठी कामं करणाऱ्या निलेश लंकेनां संधी द्या.. कारण लोकांनी हातात घेतलेली हि लोकसभा आहे.
स्रोत:(संवाद मेळावा)
