दिनांक ३ मार्च २०२५, श्रीगोंदा/पुणे:
स्वारगेट बसस्थानकातील घटनेमुळे राज्यभर संतापाची लाट असतानाच, पुणे जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे एका युवतीवर दोन नराधमांनी अमानुष अत्याचार केला.
याप्रकरणी अमोल पोटे (२५, रा. कारेगाव, ता. शिरूर, पुणे, मूळ रा. ढोकराई फाटा, ता. श्रीगोंदा, अहिल्यानगर) आणि किशोर काळे (२९, रा. कारेगाव, ता. शिरूर, पुणे, मूळ रा. किल्ले धारूर, ता. धारूर, बीड) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा तपशील:
पीडित तरुणी तिच्या मामेभावासोबत घराजवळ गप्पा मारत असताना आरोपी मोटारसायकलवर आले. त्यांनी चाकूचा धाक दाखवत मामेभावास पीडितेसोबत शरीरसंबंध करण्यास भाग पाडले आणि या संपूर्ण प्रकाराचे मोबाईलमध्ये व्हिडिओ व फोटो काढले. त्यानंतर दोघांनी आळीपाळीने पीडितेवर बलात्कार केला. शिवाय, तिच्या गळ्यातील सोन्याचा बदाम व नाकातील सोन्याची रिंग जबरदस्तीने काढून घेतली.
या प्रकरणी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. या संतापजनक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)





Advertise..
