पोलिसांवर कोयत्याने हल्ला; आत्मरक्षणार्थ गोळीबारात श्रीगोंद्यातील दोन गुन्हेगार जखमी.!

दिनांक ३ मार्च २०२५, श्रीगोंदा/पुणे:

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात चिंचोशी – केंदूर रस्त्यावर असलेल्या चिंचोशी घाटात रात्री सव्वा बाराच्या सुमारास पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्हेगाराला पकडण्यासाठी सापळा रचला. पोलिसांनी आरोपी सचिन भोसले याला अटक करण्याचा प्रयत्न केला असता त्याने उपायुक्त डॉ. शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांच्यावर कोयत्याने हल्ला केला.

या हल्ल्यात दोन्ही अधिकारी जखमी झाले. आत्मरक्षणासाठी पोलिस उपायुक्त पवार यांनी त्यांच्या सर्व्हिस पिस्तूलमधून दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी आरोपीच्या उजव्या पायाच्या नडगीला लागली, त्यामुळे तो जखमी झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन चंदर भोसले आणि मिथुन चंदर भोसले (दोघेही रा. खरातवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) हे विविध गुन्ह्यांमध्ये पाहिजे होते. आरोपी सचिन भोसले याने पोलिसांवर प्राणघातक हल्ला करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांनी तक्रार दाखल केली आहे.

आरोपी सचिन भोसले याच्यावर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading