तालुक्यातील बेरोजगारांना काम द्या.! विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी RPI (A) सोमवारपासून आंदोलन तीव्र करणार: (जिल्हाध्यक्ष) सुनिल साळवे…

दिनांक ९ एप्रिल, श्रीगोंदा:

दिनांक ५ एप्रिल २१ रोजी आर.पी.आय. (आठवले) गटाच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक प्रशासनास दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने श्रीगोंदा स्टेशन रोडवरून राजस्थान हाय वे कन्स्ट्रक्शनच्या मुरूम वाहणाऱ्या हायवा गाड्या अडवून प्रतीकात्मक आंदोलन करत असतांना, नमूद गाडी चालकांनी Rpi च्या कार्यकर्त्यांवर गाड्या घालत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी त्या गाड्यांच्या काचा फोडल्या. यानंतर श्रीगोंदा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत गुन्हे दाखल करून सोडले.

याबाबत संघटना पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रात दिलेली माहिती अशी की, राजस्थान येथील एका कंपनीने राष्ट्रीय महामार्ग निर्मितीचे तालुक्यातील काष्टी ते पिर फाटा, कर्जत दरम्यानचे काम घेतलेले आहे. त्या कामासाठी ठेकेदाराने राजस्थान येथील यंत्र सामुग्री, संसाधन व मनुष्यबळ कार्यान्वित केले आहे. कोरोना महामारी मध्ये वाढत चाललेली बेरोजगारी आणि अशा पद्धतीने कंपनी बेरोजगार तरुणांच्या समोरून कार्यक्षेत्रात काम करणे म्हणजे, स्थानिक तरुणांची उपेक्षा केल्यासारखे आहे. असे मत या कार्यकर्त्यांनी नोंदवले आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

याविषयी दिनांक ८ एप्रिल रोजी जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या उपस्थितीत श्रीगोंदयात कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यामध्ये साळवे यांनी संविधानिक मूल्य जपत कायद्याच्या चाकोरीत आंदोलन करण्याच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. मात्र, अपेक्षित मागण्यांची पूर्तता होत नसेल. तर, आंदोलनाची तीव्रता वाढवणे ही गरजेचे आहे. असेही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी बोलतांना नमूद केले. दिनांक १२ एप्रिल २१ वार सोमवार रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आर.पी.आय. (आ) कार्यकर्त्यांच्या माध्यमांतून आंदोलन करण्यात येणार आहे. संबंधित ठेकेदाराने स्थानिक बेरोजगार तरुणांना कामावर घ्यावे, त्यांच्या हाताला काम द्यावे, कोरोना महामारीचा कहर वाढत चालला असून, साधारण लोकं या सर्व परिस्थितीशी दोन हात करण्यास आर्थिक दृष्ट्या कमजोर आहेत. अशा स्थितीमध्ये सामान्यांच्या हाताला जर रोजगार मिळाला. तर, कुटुंब निर्वाहासाठी त्यांना एक साधन निर्माण होईल. असे साळवे यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी बोलतांना म्हणाले.(Give work to the unemployed! RPI (A) will start intense agitation from Monday to fulfill various demands: (District President) Sunil Salve …)

ठेकेदार आंदोलनांच्या अनुषंगाने नमूद केलेल्या मागन्यांची पूर्तता करण्यास उदासीन असेल. तर, आंदोलन तीव्र करू व त्यातून उदभवणाऱ्या परीणामांची सर्वस्वी जबाबदारी स्थानिक प्रशासनाची राहील. असे साळवे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रात नमूद केले आहे.

यावेळी तालुक्यातील आर.पी.आय.चे कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा उपाध्यक्ष (युवक) राजा जगताप, (शहराध्यक्ष) विशाल घोडके, अविनाश घोडके, अक्षय घोडके, स्वप्नील घोडके, प्रवीण घोडके, श्रीकांत घोडके, तुषार जगताप, योगेश घोडके, शुभम आठवले, जॉन घोडके, साहिल घोडके, फिरोज शेख, श्याम घोडके, रत्नदीप घोडके, शनी घोडके, अक्षय उर्फ एलियन घोडके, (ज्येष्ठ मार्गदर्शक) गौतम अण्णा घोडके व लक्ष्मण घोडकेंसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सामाजिक अंतर व कोरोनाचे नियम पाळत सदरील बैठक पार पडली. या आंदोलनाबाबतचे प्रसिद्धी पत्र सुनिल साळवे यांनी बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधीनां दिले.

स्त्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading