काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात कॅप्टन अजय सिंह यादव यांची सदिच्छा भेट..

दिनांक १३ ऑगस्ट २०२४,श्रीगोंदा:

श्रीगोंदा येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात आज मंगळवार, दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री कॅप्टन अजय सिंह यादव यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीत त्यांनी पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांसोबत विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

या प्रसंगी ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष कांतीलाल कोकाटे, वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष संजयजी आनंदकर सर, श्रीगोंदा नगरपालिका माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब शेलार, प्रदेश ओबीसीचे अध्यक्ष माळी, ओबीसी राष्ट्रीय समन्वय अध्यक्षा मंगलताई भुजबळ, ओबीसी सेलचे नगराध्यक्ष राजेंद्र कुटे, मुकुंद सोनटक्के, प्रा. पाटील सर, अजीमभाई जकाते, आदेश जराड, संजय झेंडे, आनंदा माने, संजय इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कॅप्टन अजय सिंह यादव साहेब यांच्या या भेटीदरम्यान, पक्षाच्या भविष्यातील योजनांवर चर्चा झाली आणि ओबीसी समाजाच्या हितासाठी अधिक मजबूत काम करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शनही केले गेले. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या भेटीचा लाभ घेतला आणि आपल्या तालुक्याच्या विकासासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा संकल्प व्यक्त केला.

कॅप्टन यादव यांच्या सदिच्छा भेटीमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे, आणि आगामी काळात काँग्रेस पक्षाचे कार्य आणखी बळकट होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading