नवी मुंबईत २२ ऑगस्ट रोजी पार पडणार संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन..

दिनांक १३ ऑगस्ट २०२४,नवी मुंबई:

मराठा-बहुजन समाजात वैचारिक बदल घडविण्यासाठी गेली २७ वर्षे सातत्याने कार्यरत असलेल्या संभाजी ब्रिगेड संघटनेच्या एकदिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन दिनांक २२ ऑगस्ट २०२४ रोजी वाशी (नवी मुंबई) येथे करण्यात आले आहे. हे अधिवेशन विष्णुदास भावे नाट्यगृहात सकाळी १०:०० ते सायंकाळी ७:०० या वेळेत पार पडणार आहे. महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी व वाढवण्यासाठी या अधिवेशनात हजारोंच्या संख्येने सहभागाची अपेक्षा आहे. 

या अधिवेशनात ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार, खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, विजयसिंह मोहिते पाटील यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी आ. रोहित पवार, खा. अमोल कोल्हे, सिनेअभिनेते सयाजी शिंदे, निखिल चव्हाण आणि गौरव मोरे हे उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले असून, “गोष्ट पैशापाण्याची” या पुस्तकाचे लेखक प्रफुल्ल वानखेडे, ज्येष्ठ संपादक श्रीराम पवार, निर्भिड पत्रकार निरंजन टकले आणि लेखक चंद्रकांत झटाले हे विविध सत्रांमध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत.

समारोपीय सत्रामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते कोल्हापूरचे नवनिर्वाचित लोकसभा खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा शाही सन्मान सोहळा पार पडणार आहे. याशिवाय ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे चेअरमन राजेंद्र पवार, सह्याद्री फॉर्म्स नाशिकचे मॅनेजिंग डायरेक्टर विलास शिंदे आणि सुप्रसिद्ध उद्योजक सतिश मगर यांना विश्वभूषण (कृषी) पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अधिवेशनात सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी sambhajibrigade.org या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading