गुगळे परिवाराचा गायांचा ओपन गोठा..

दुष्काळाची सामना करून विक्रमी कांदा उत्पादन करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या भानगाव येथे हेमराज गुगळे, अशोक गुगळे यांना शेतीचा लळा लागला त्यांची मुल दर्शन व अमोल यांनी काळाची पावले ओळखत वीस गायींची क्षमता असलेला ओपन गोठा तयार केला या गोठ्यात चारा. पशुखाद्य पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी व गायी धुण्यासाठी खास सुविधा आहे. आणि हा गोठा दुधातील नफ्यातून केला आहे.

सध्या गुगळे बंधूंच्या गोठ्यात १७ संकरित गायी असुन डेअरीला दररोज २०० लिटर जाते या व्यवसायातून दरमहा ५० हजाराचा निव्वळ नफा मिळत आहे. लवकरच ३०० लिटर दुध संकलन होईल अशा पद्धतीने गोठ्याचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. हेमराज व अशोक आणखी तीन भाऊ ते व्यवसायाच्या निमित्ताने पुणे नगरमध्ये स्थानिक झाले. पण हेमराज व अशोकलाल यांनी भानगाव मधील शेतकऱ्यांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. किराणा दुकान अगर इतर व्यवसाय न करता फक्त शेती आणि गायी पालन करून शेतीला आकार देत असताना नेहमी खिलारी बैल जोडी जोडी आवडीने पाळण्याचे काम केले आहे. सध्या सव्वा लाखाची बैलजोडी आहे.

हेमराज यांचा मुलगा दर्शन अशोकलाल यांचा मुलगा अमोल हे दोघेही बारावी पास झाले आणि शिक्षणात वेळ घालविण्यापेक्षा स्वबळावर शेती व गायी पालन करण्याचा निर्णय घेतला आहे. चार गायावर व्यवसायाला सुरूवात केली. वेरुळ, अजिंठा येथील संजय चव्हाण व अलका चव्हाण हे जोडपे गायी गोठ्याची देखभाल करण्यासाठी आणले. चव्हाण जोडप्याने अतिशय इमानदारीचे काम केले हे गुगळे परिवाराचे सदस्य बनले. चार गायांवर सुरू झालेल्या या ओपन गोठ्यात सध्या होस्टेल जर्शी गायी आहेत सुमारे २०० लिटर दूध निघते. गुगळे परिवाराचे ओपन गायीसाठी चारा व पशुखाद्य विकतचे आहे. पशुवैद्यकीय तज्ञ भुषण हिंगसे हे गायीच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळत आहेत . त्यामुळे यावर ६० % खर्च होतो आणि ४० % दुधातून शिल्लक राहतात. शिवार जमीनीला मोठ्या प्रमाणावर शेणखत शिल्लक राहत आहे. त्यामुळे गुगळे परिवाराच्या शेतीला सेंद्रिय शेतीचा रंग भरला आहे. गुगळे बंधूंनी तीन वर्षांपुर्वी किराणा दुकान सुरू केले भानगाव परिसरातील शेतकऱ्यांशी गुंगळे बंधूचे चांगले संबंध असल्याने किराणा दुकानात गुगळे बंधूंना सुर सापडला आहे. पण गायी पालन व्यवसायाला देवरूपी व्यवसाय मानत आहेत. त्याकडे अधिक लक्ष देत आहेत.

संदेश

आम्ही जैन समाजातील असलो तरी आमचे वडील व काकांची शेतीवर फार श्रद्धा होती त्यामुळे मी व दर्शन ने कुठे न जाता आपल्या मायभुमीतील गायी पालन करुन दुग्ध व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि दुध व्यवसाय चिकाटीने केला त्यामुळे या व्यवसायात यश आले आहे. ग्रामीण भागातील तरूण मुलांनी शेतीशी निगडीत कोणताही व्यवसाय केला तरी चांगले यश येईल फक्त व्यवसाय करण्या मागचा हेतू स्वच्छ असला पाहिजे. अमोल गुगळे,भानगांव.

स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)
प्रस्तुत माहिती पुस्तक प्रकाशन वेळेची आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading