श्रीगोंदा पोलिसांची मोठी कामगिरी! आनंदवाडीतील घरफोडीप्रकरणी तिघे अटकेत; रोख रक्कम हस्तगत, मुख्य आरोपी फरार..

दिनांक ९ जुलै २०२५,श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील आनंदवाडी येथे १० ते ११ मे २०२५ च्या दरम्यान दोन घरी झालेल्या घरफोडी प्रकरणातील तिघा आरोपींना श्रीगोंदा पोलिसांनी अटक करून मोठी कामगिरी बजावली आहे. आरोपींकडून २०,००० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, मुख्य आरोपी सध्या फरार आहे.

ही घरफोडी आनंदवाडीतील पांडुरंग दत्तात्रय खामकर (वय ६५) आणि त्यांचे शेजारी शिवाजी नेहलचंद्र कोरडकर यांच्या घरात झाली होती. रात्री झोपेत असताना अज्ञात आरोपींनी दरवाजाचे कडी-कोयंडे तोडून घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत असताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा तपास लावण्यात आला. गुन्हे शोध पथकाने पुणे जिल्ह्यातील दौंड येथे जाऊन सापळा रचून तीन आरोपींना ताब्यात घेतले –

  1. सुरज नितीन काळे (वय २२, रा. इंदिरानगर, दौंड)
  2. जंक्या शफया भोसले (वय २५, रा. वेताळनगर, दौंड)
  3. योगेश उर्फ शाकीर शफया भोसले (वय २६, रा. वेताळनगर, दौंड)

आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांचा एक फरार साथीदार दागिने घेऊन पसार झाला आहे. आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून फरार आरोपीचा शोध सुरु आहे.

तिघांविरुद्ध पूर्वी दाखल गुन्ह्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
🔸 जंक्या शफया भोसले – जबरी चोरी, मारहाण यांसारख्या गुन्ह्यांमध्ये गुन्हे दाखल
🔸 योगेश उर्फ शाकीर भोसले – जबरी चोरी, शस्त्र कायदा, मारहाण, मुंबई पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हे
🔸 सुरज नितीन काळे – गंभीर स्वरूपाचे गुन्हे व पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल

ही कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय अधिकारी गणेश उगले, पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर, गुन्हे शोध पथकाचे पो.ना. संग्राम जाधव व त्यांच्या टीमने तसेच सायबर सेलच्या मदतीने ही यशस्वी कारवाई पार पाडली. पुढील तपास पो.उपनिरीक्षक सचिन लिमकर व पो.कॉ. अमित बर्डे हे करत आहेत.

स्रोत:(श्रीगोंदा पोलीस स्टेशन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading