दिनांक १ फेब्रुवारी २०२५,श्रीगोंदा:
अखिल भारतीय औषध विक्रेते संघटनेचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ शिंदे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त श्रीगोंदा मेडिकल असोसिएशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल १४५ पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन प्रेरणा अपंग सेवाभावी संस्था आणि प्रहार दिव्यांग संघटनेच्या सहकार्याने करण्यात आले.
यावेळी प्रेरणा अपंग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पोकळे यांनी श्रीगोंदा तालुका मेडिकल असोसिएशनचे तालुका अध्यक्ष संजय ओव्हाळ यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि शाल देऊन सन्मान केला.
रक्तदान शिबिराच्या या उपक्रमात वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सामाजिक जाणिवेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. श्रीगोंदा तालुक्यातील वैद्यकीय असोसिएशनने अशा सकारात्मक उपक्रमांसाठी पुढाकार घेतल्याबद्दल स्थानिकांनी कौतुक केले.
या कार्यक्रमात दिव्यांग संघटनेचे अनेक कार्यकर्ते, डॉक्टर आणि औषध विक्रेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)




