दिनांक १७ जानेवारी,श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरात संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज राज्यभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी पेडगाव चौकात मान्यवर व नागरिकांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे (सहाय्यक पोलिस निरीक्षक) दिलीप तेजनकर, श्रीनपाचे (उपनगराध्यक्ष) रमेश लाढाणे, नानासाहेब कोथिंबीरे, श्रीगोंदा नगरपालिकेचे (मुख्याधिकारी) मंगेश देवरे, दिलीप डेबरे, वैभव पाचपुते, अरविंद कापसे, नानासाहेब शिंदे, नंदू ससाणे, (मार्केट कमिटीचे सभापती) संजय आबा जामदार सोबत सर्व संचालक मंडळ, सचिव, (माजी सरपंच) संतोष शिंदे, (संभाजी ब्रिगेडचे) मयूर आढाव, गणेश ससाने, शिवाजी रोही, गणेश पारे, सागर हिरडे, अक्षय खामकर व नागरिक उपस्थित होते.
स्रोत:(नानासाहेब शिंदे,संभाजी ब्रिगेड,श्रीगोंदा)
