महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात लक्ष्मीबाई भाऊराव पाटील स्मृतिदिनानिमित्त अभिवादन..

दिनांक १ एप्रिल २०२५,श्रीगोंदा:

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या त्यागातूनच रयत शिक्षण संस्था उभी राहिली. त्या कर्मवीर भाऊराव पाटील यांची सावली बनून संपूर्ण आयुष्य समर्पित करत जगल्या, असे प्रतिपादन महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. महादेव जरे यांनी केले.

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या ९५ व्या स्मृतिदिनानिमित्त महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने विशेष अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात डॉ. जरे बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अनंत सोनवणे यांनी केले.

या वेळी उपप्राचार्य प्रो. डॉ. प्रकाश साळवे, उपप्राचार्य डॉ. सुदाम भुजबळ, प्रो. डॉ. राजेंद्र ठाकरे, कार्यालय अधीक्षक बाळासाहेब राऊत, डॉ. रावसाहेब काळे, प्रा. अरुण जाधव, डॉ. राहुल गायकवाड, प्रा. अनिल ढवळे, ग्रंथपाल यशोदा लबडे, प्रा. श्रीकांत थोरात, डॉ. रामदास ढगे आदी प्राध्यापक तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार दिले.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading