दिनांक १३ एप्रिल २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंद्यात महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त गुरू शिष्य संयुक्त जयंती २०२४ विचार प्रबोधन व्याख्यान माला आयोजीत करण्यात आली. शेख महंमद बाबा यांच्या प्रांगणात सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक १३ एप्रिल २०२४ रोजी श्री.आर एस यादव सर यांचे व्याख्यान संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ रफिक सय्यद हे होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. सूत्रसंचालन ॲड. प्रदीप खामगळ यांनी केले. तर, प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते मुकुंद सोनटक्के यांनी केले.
यावेळी प्रमुख भाषणात बोलतांना आर एस यादव यांनी नमूद केले की, फुले आणि आंबेडकर हे दोन शरीर एक मेंदू आहेत. महत्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समान आहेत. आदर्श राष्ट्र निर्माण करणे शिक्षणाचे कार्य आहे. माणसातल्या माणसाला निर्माण करण्यासाठी महापुरुषांनी संघर्ष केला. शिकलेला माणूस अज्ञानी समाजाचे नेतृत्व करु शकतो. असे यादव यांनी स्पष्ट केले.
एकट्या माणसाच्या शिक्षणात मोठी शक्ती आहे. शिकलेल्या महापुरुषांनी मानवतेचा उद्धार केला. याप्रसंगी वामनदादा कर्डक यांच्या गीताचा दाखला दिला. ‘भिमा तुझ्या मताचे पाच लोकं असते’.. एकट्या भीमाने शिकून येवढे मोठं कामं केले. अशी पाच माणसे असते तर, लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. एखादा प्रियकर प्रियशीची उत्कटतेने वाट पाहतो.. तशी मला पुस्तकांची ओढ लागते.. असे त्यांनी नमूद केलं. एकीकडे जग चंद्रावर जात असताना भारतातील लोकं कोजगिरीत चंद्र दुधात बघतात. यासाठी शिकेलेल अडाणी लोकं कारणीभूत आहेत. त्यामूळे आपल्याला फुले आंबेडकरी विचाराचे लोकं समाज निर्माण करतील. देवाने पावल्याने कोणी नेता, पुढारी, राष्ट्रपती, आणि पदाधिकारी नोकरीला लागले नाहीत. हे महापुरुषांचे योगदान आहे.
पुणे विध्येच माहेरघर आहे, कारण तेथे महत्मा फुले आणि सावित्रीबाईचे घरं आहे. तेच देशातल्या लेकिंचे माहेर आहे. इतिहास भोगाचा नाही तर, त्यागाचा लिहला जातो. हजोरोंचे मठ, मंदिर बांधणारे उरले नाहीत.. मात्र चिंध्या पांघरून प्रबोधन करणाऱ्या गाडगे बाबांचे विचार श्रेष्ठ आहे. सत्य आणि नीती साठी महात्मा फुलेनीं धर्म दिला. सत्यशोधकाचा धर्म समजणे इथल्या पाखंड्याना समजु शकत नाही. असे त्यांनी नमूद केले.
हिंदु धर्म ही न दुरुस्त होणारी व्यवस्था असल्याने डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करून, धम्माचा स्वीकार केला. शेतकऱ्याचे कैवारी महात्मा फुले आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक पुस्तक लिहले. अण्णा भाऊ दीड दिवस शिकले त्यांनीही मोठं साहित्य लिहिले. त्यांच्याकडे समिक्षण आणि आफाट ज्ञान होते. शेतकऱ्याचे प्रश्न मंदिराचे उद्घाटन होऊन होत नाही. तर, धरण बांधून होईल. विद्यापीठ बनुन विद्यार्थी सदृढ बुध्दीचे बनतील.. राष्ट्र चालवणारे शेतकऱ्यासाठी काही करत नाहीत. असे यादव यांनी सांगितले.. हे राष्ट्र जागवण्यासाठी लोकशाहीची लढाई लढावी लागेल. पुढे त्यांनी सांगितले की, बाबासाहेबांनी सर्व शाह्या नाकारून लोकशाही दिली. लोकशाहीत लोकं मालक असतात. मताचा अधिकार हा लोकशाहीचा गाभा आहे. ज्या राष्ट्रात लोकांना राष्ट्रहिताचा भावना जाणवत नसतील तर, राष्ट्र गुलामिकडे वाटचाल सुरू होते. जाती या तोडण्याचे आणि गुलामीचे साधन आहे. म्हणुन, बाबासाहेबांनी घटनेत आम्हीं भारताचे लोकं अशी व्याख्या केली आहे. असे प्रतिपादन यादव यांनी केले.
बाबासाहेबांनी कधी मानलेल्या गुरूंचा जयजयकार केला नाही. तर, त्यांचे विचारांचे अनुकरण केले. जयंतीत नाचणारे दुसऱ्याच्या रिमोटच्या नियंत्रणात असतात. जयंतीच्या एका दिवशी सबंध वाजणारे अनाठायी dj चा खर्च जर, एकत्र केला तर, जगविख्यात विद्यापीठ तयार होऊ शकतात. मात्र, येथील बहुजनांना नियंत्रणात ठेवणाऱ्यांना ती अडचण होऊ शकतो. असे मत व्यक्त केले. क्षेत्रफळ मोठं असल्याने देश मोठा होत नसतो.. ज्ञानाने विकसित असणाऱ्या लोकांच ठिकाणं प्रगत देशाचे लक्षण आहे. विविध सामाजिक विषयांवर आर एस यादव यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रफिक सय्यद यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ, संपादक अमिन शेख, उप सरपंच अनुराधाताई ठवाळ, ॲड.महेंद्र शिंदे, ॲड.संभाजी बोरुडे, ॲड.सुमित बोरुडे, संजय गायकवाड, भारत घोडके, पुष्पक घोडके, प्रविण साळवे, मनिषा घोडके, शोभाताई घोडके, रावसाहेब घोडके, सचिन झगडे, रफिक इनामदार, जानराव सर, बबन आनंदकर, विजय चव्हाण, बाळासाहेब अल्हाट, नाशिर शेख सह फुले आंबेडकर विचार मंचचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
स्रोत:(आयोजीत कार्यक्रम)

