‘कमवा आणि शिका’ योजनेतील विद्यार्थ्यांचे मानधन लॉकडाऊन च्या काळातही देण्यात यावे.

दिनांक ३ एप्रिल,श्रीगोंदा:

महाराष्ट्रातील विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या ‘कमवा आणि शिका’ योजनेचा फायदा घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मानधन लॉकडाऊनच्या काळातही विद्यार्थ्यांना देण्यात यावे.अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अक्षय अनभुले यांनी राज्य शासन व विद्यापीठाकडे केली आहे.

राज्यातील विद्यापीठांमध्ये ज्यांची आर्थिक परिस्थिती गरिबीची आहे.अशा विद्यार्थ्यांसाठी कमवा आणि शिका ही योजना असते.या योजनेचा लाभ घेऊन हजारो गरीब विद्यार्थी श्रमदान करून पैसे कमवतात व त्या मिळालेल्या पैशातून आपल्या शिक्षणाचा,खाण्यापिण्याचा व इतर खर्च भागवितात. आजही हजारो विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊन आपले शिक्षण पूर्ण करत आहेत.

कोरोना या रोगाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉक – डाऊन असल्याने राज्यातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालये बंद आहेत.त्यामुळे या विद्यार्थ्यांना श्रमदान करता येत नाही.तरी,शासनाने लॉकडाऊनमुळे विद्यापीठ व महाविद्यालये बंदच्या काळातही या योजनेत काम करणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे मनरेगा योजनेतील लोकांना मानधन देण्यात येणार आहे.तसेच,या विद्यार्थ्यांना ही कमवा आणि शिका योजनेचे मानधन वेळेवर द्यावेत.

ग्रामीण,शहरी भागातील गरीब विद्यार्थ्यांना भेडसावणारी आर्थिक अडचण दूर करण्यास मदत करावी.याबाबतचा लवकरात लवकर शासनाने आणि विद्यापीठाने सकारात्मक निर्णय घेऊन ‘कमवा आणि शिका’ योजने अंतर्गत मिळणारे मानधन महाविद्यालय बंदच्या काळातही विद्यार्थ्यांना मिळेल.अशा आशयाचे परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.अशी मागणी अक्षय अनभुले यांनी शासनाकडे,विद्यापीठ कुलगुरू आणि विद्यार्थी विकास मंडळाकडे केली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालक यांच्याशी अक्षय अनभुले यांची दूरध्वनीद्वारे चर्चा झालेली आहे. लवकरात लवकर बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल,असा विश्वास संचालकांनी अक्षय अनभुले यांना दिला आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading