दानशूर लोकांनी दातृत्व दाखवून, जी आज मदत केली. म्हणून तर, महिनाभर माझी चूल पेटेल.

आदिवासी फासेपारधी ,डोंबारी समाजाची चूल पेटली..

गो ! कोरोना !..

महामानव बाबा आमटे संस्थेने केलेल्या कोरोनाग्रस्त प्रसंगी “चूल आदिवासी, डोंबारी, कष्टकरी बांधवांसाठी” आवाहनाला प्रतिसाद देत मदत करीत आहे.

मनोगत व्यक्त करताना आदिवासी महिला..

कोरोना मुळे जीव नकोसा झाला,हाताला कामं नाही, पोर भाकरी भाकरी करतायेत, माझी ५ लेकरं महामानव बाबा आमटे संस्थेत असतात, मी फक्त त्यांना जन्म दिला.मग सगळं संस्थेने केलेलं!

आज माझ्यावर वेळ आली.नवरा जेल मध्ये हाताला काम नाही.बकऱ्या हायत, त्या डोंगरा माळावर,राहून दिवस काढते.कोरोना मुळे माझे पोर घरी आली.आता एवढी पोर, ४ महिने संभाळाची, अवघड आहे.

सुनीता काळे..

वर्षभरात २ महिने पोर घरी असतात.मुलांना काय करायचे काय शिकवायचे ? माहीत नाही. पण , संस्थेतील भाऊ माझ्या पोरांना खूप जपतात, सुट्ट्या लागल्या तरी,माझ्या पोरांची अनं माझी उपासमार पाहून संस्थेच्या भाऊ ने मला किराणा पोहच केला.ज्यांनी किराणा दिला.त्या भाऊचे खूप उपकार राहतील.

खलिदा भोसले..

समाजातील दान शूर व्यक्ती ना महामानव बाबा आमटे संस्थेने श्रीगोंदा तालुक्यातील १५० कुटुंबीयांना त्यांच्या घरी पालावर, झोपडपट्टी परिसरात जाऊन किराणा अन्नधान्य वाटप केले.

श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव, सुरेगाव, देऊळगाव, काष्टी परिसरातील सुमारे १५० कुटुंबाना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी काष्टी येथील डोंबारी समाजातील ६० कुटुंबांना तहसीलदार महेंद्र माळी यांच्या हस्ते किराणा वाटप करण्यात आले.

या उपक्रमासाठी सतीश बोरा, गौरव बोरा, डॉ. नारायणराव गवळी यांनी मोलाचे सहकार्य केले. या किराणा सामानात डेटॉल साबण, मीठ, मिरची, तेल, पोहे, रवा, शेंगदाणे, साखर आणि कडधान्य आदी एक महिना पुरेल एवढ्या साहित्याचा संच तयार करून सर्व टीम संस्थेच्या गाडीत साहित्य वाटपाचे काम करीत आहे.

यावेळी संस्थेच्या कार्यकर्त्यांना अनेक अनुभव आले. अडचणीच्या काळात कोरोनामुळे निर्माण झालेल्या,या परिस्थितीमुळे सर्व आदिवासींची चूल बंद पडली होती.

याप्रसंगी सुनीता सगडया या महिलेने आपली व्यथा मांडताना सांगितले की,संध्याकाळी जेवणासाठी काहीही शिल्लक नाही. हातात कोणतेही काम नाही, मजुरी नाही, सर्व दुकाने, बस, रेल्वे बंद असल्याने आणि कोरोनारोगाच्या संकटामुळे कुटुंब आता उपाशी मरणार आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली. कुटुंबातील ५ मुले उपाशी पडतील आता काय करू?

परंतु समाजातील अनेक जाणता अजाणता दानशूर लोकांनी दातृत्व दाखवून,जी आज मदत केली.म्हणून तर, महिनाभर माझी चूल पेटेल. पण हा रोग लवकर जायला हवा. कारण हा रोग गेला नाही.तर पुढील महिन्यात काय होणार अशीच परिस्थिती येणार ? ही महिला नवरा जेलमध्ये असतांना देखील परिस्थितीशी दोन हात करत आहे.याचे नवल वाटले. ही फक्त एका सुनीताची परिस्थिती नाही.तर,अशा तिच्यासारख्या अनेक कुटुंबाची हीच परिस्थिती होती.

गेल्या ६ दिवसांत केलेल्या मदतीच्या आवाहनाला आपण भरभरून प्रतिसाद देत आहात.यामुळे या आदिवासी भटक्या कुटुंबाना कोरोना पासून भीती वाटत नाहीये.

श्रीगोंदा तालुक्यातील गरीब गरजू आणि कष्टकरी असलेल्या ५०० कुटुंबियांना एक महिना पुरेल एवढा किराणा देण्याचा संस्थेचा मानस आहे.

संस्थेतील विकास पाटील, भगवान काळे, मनेश गोंजारे, अक्षय शिंदे, अनिल पवार, शुभांगी झेंडे, अभिषेक काळे, अश्विन बारबोले ही टीम काम करत आहे. यासाठी मा. तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांचेही सहकार्य लाभत आहे.

(शब्दांकन : विकास पाटील)

आपला कृतज्ञ,अनंत झेंडे
महामानव बाबा आमटे संस्था श्रीगोंदा जिल्हाअहमदनगर
मो.क्रं: ९४०४९७६८३३

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading