भीषण आणि विचित्र अपघात.! आढळगावजवळ दुभाजकाला धडकून मोटरसायकल पेटली; तांदळी दुमालाचे दोन तरुण जखमी, एकाचा ८० टक्के भाजल्याने मृत्यु…

श्रीगोंदा (दि. १ जुलै २०२५)

श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव परिसरात काल दुपारी झालेल्या एका भीषण अपघातामुळे खळबळ उडाली आहे. तांदळी दुमाला येथील रहिवासी दादा कन्हेरे व बंटी धालवडे हे मोटरसायकलवरून जात असताना त्यांच्या दुचाकीचा आढळगाव येथील सिद्धेश्वर महाराज मंदिराजवळ रस्ता दुभाजकाला जोरदार धडक बसली. धडकेनंतर मोटरसायकलचा स्फोट झाला आणि गाडीने पेट घेतला.

या आगीत मोटरसायकलवरील बंटी धालवडे गंभीररित्या भाजले गेले. स्थानिक नागरिकांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आणि जखमींना तत्काळ श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टर आकाश कोकरे यांनी प्राथमिक उपचार करून पीडितांना पुढे पाठवले.. गंभीर अवस्थेतील बंटी धालवडे यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात तर दादा कन्हेरे यांना अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

बंटी धालवडे यांचा पाय व हातांमध्ये फ्रॅक्चर झाले होते. तर, त्यांच्या शरीराचे सुमारे ८० टक्के भाग भाजला गेला होता. काल रात्री ते उपचारादरम्यान मयत झाले.

अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.. अशा प्रकारे दुभाजकाला धडकून वाहन पेट घेतल्याची घटना अत्यंत दुर्दैवी व धक्कादायक मानली जात आहे. या अपघातामुळे श्रीगोंदा तालुक्यात चर्चा सुरू असून स्थानिकांनी प्रशासनाकडे रस्त्याच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading