दिनांक १९ जून,श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरातील साळवनदेवी रोड परिसरात राहणाऱ्या पती – पत्नी (वय वर्षे ७० व ६५ अनुक्रमे) राशिन येथून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने, कोरोना पॉझिटिव्ह निघाल्या आहेत. काल त्यांना संशयित म्हणून ताब्यात घेत, त्यांचे स्त्राव नमुने तपासण्यात आले होते. आज मिळालेल्या अहवालात ते दोघे कोरोना पॉझिटिव आल्याचे समोर आले आहे. आसपासचा परिसर संक्रमित होऊ नये. म्हणून, श्रीगोंदा एसटी स्टँड परिसरापासून साळवनदेवी मंदिरापर्यंत जाणारा रस्ता कंटेनमेंट झोन म्हणून, घोषित करण्यात आला आहे.
तालुक्यात लॉकडाऊन शीतल झाल्यानंतर इतर जिल्ह्यातून गावाकडे येणाऱ्या लोकांमार्फत कोरोना पोहोचला. मात्र, त्यांचे तालुक्यातील इतर लोकांना संक्रमण झाले नव्हते. आता राशीन वरून आलेल्या इसमाकडून संक्रमण होत ते दोघे पती-पत्नी कोरोना पॉझिटिव झाल्याचे डॉक्टर नितीन खामकर (तालुका आरोग्य अधिकारी) यांनी माध्यमांना सांगितले आहे. त्यांचे काल स्त्राव नमुने तपासल्यानंतर ते कोरोना बाधित असल्याचे समजले असून, नमूद दोघांनाही सर्दी खोकला किंवा कोरोनाचे कोणतेही लक्षण दिसत नसले तरी, ते बाधित झाले आहेत. असे डॉक्टरांनी सांगितले आहे. थेट बाधित व्यक्तीचा संपर्कात आल्याने ते संक्रमित झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
यामुळे, श्रीगोंदा बसस्थानकापासून साळवनदेवी मंदिराकडे जाणारा रस्ता हा प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. तालुक्यात कोंडेगव्हाण, श्रीगोंदा कारखाना व कोरेगाव येथील व्यक्तींमुळे कोरोना संक्रमन झालेल्या गावांत समावेश होता. तर, हे नमूद सर्व उपचारानंतर ठणठणीत बरे झाल्याचे सर्वश्रुत आहे.
