कोरोना योध्दांचा सन्मान..अग्नीपंख फौंडेशनचा स्तुत्य उपक्रम.:बबनराव पाचपुते..

दिनांक १९ जून (काष्टी,श्रीगोंदा):

श्रीगोंदा तालुक्यावर कोरोनाचे संकट येऊ नये प्रशासकीय यंत्रणा जीवाचे रान केले आहे.कोरोना संचारबंदी काळात दानशुर व्यक्ती संस्थांनी गोरगरीबांना मदत करण्याची भुमिका घेतली अग्नीपंख फौंडेशनने अशा व्यक्ती संस्थांचा कोरोनायोध्दा म्हणून सन्मान केला.हे कौतुकास्पद आहे.असे गौरवोद्गार आ.बबनराव पाचपुते यांनी काष्टी येथे बोलतांना काढले.

काष्टी येथील साईसेवा पतसंस्थेच्या सभागृहात अग्नीपंख फौंडेशनने संचारबंदी काळात गोरगरीब कुंटुबांना मदत करणाऱ्या ३९ व्यक्ती संस्थांचा आ. बबनराव पाचपुते,तहसीलदार महेंद्र महाजन, पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे हस्ते सन्मान केला.यावेळी बबनराव पाचपुते बोलत होते.

पाचपुते पुढे म्हणाले कि,कोरोनामुळे माणसाने माणसाशी कसे वागावे याचा धडा दिला.भविष्यात कोरोनाला बरोबर घेऊन जीवन जगण्याची तयारी ठेवावी लागेल.

तहसीलदार महेंद्र महाजन म्हणाले कि,कोरोना संचारबंदी काळात नागरिकांनी प्रशासनाला मदत केली.त्यामुळे आपला तालुका कोरोना मुक्त झाला आहे.पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव म्हणाले की,भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन काम करीत असलेल्या अग्नीपंख फौंडेशनने कोरोना लढाई काम करणाऱ्या सफाईचे काम करणाऱ्या पासून प्रांताधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना सन्मानीत करू प्रोत्साहन दिले आहे.

यावेळी, (नागवडे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष)केशव मगर,(काँग्रेसचे तालुकाध्यक्ष)दिपक भोसले, (साईसेवाचे अध्यक्ष) माऊली पाचपुते यांची भाषणे झाली. प्रास्ताविक (अग्नीपंखचे कार्याध्यक्ष) दिलीप काटे यांनी केले. यावेळी, विक्रमसिंह पाचपुते, दत्तात्रय गावडे, सुनील पाचपुते, सुनील दरेकर, चांगदेव पाचपुते, आबासाहेब कोल्हटकर, अग्नीपंखच्या शुभांगीताई लगड, धीरज डांगे, मधुकर काळाणे, उत्तम मोरे मदन गडदे उपस्थित होते.आभार गणेश डोईफोडे यांनी मानले.

(स्त्रोत:अग्निपंख फौंडेशन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading