दिनांक १२ नोव्हेंबर, श्रीगोंदा/कर्जत:
मूळचे कर्जत तालुक्यातील येसवडी येथील कुंडलिक सोनवणे हे व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यातील वारजे माळवाडी या ठिकाणी राहणारे कुंडलिक सोनवणे यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ गोर गरीब जनतेची दिवाळी गोड करण्यासाठी संपूर्ण गावाला दिवाळीच्या सामानाचे किट वाटप करण्यात आले.त्यावेळी येसवडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

कै. तात्याबा भागुजी सोनवणे यांच्या स्मरणार्थ त्याचे चिरंजीव कुंडलिक सोनवणे यांना गोर गरीब यांच्या विषयी मोठ्या प्रमाणात आपुलकी निर्माण होतीच. त्याच माध्यमातून त्याच्या असलेल्या शिवजोत प्रतिष्ठान व जिवलग प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आपल्या गावाकडील गोर गरीब जनतेची दिवाळी गोड करण्याचा निर्णय कुंडलिक सोनवणे यांनी घेतला. त्यानुसार त्यांनी कर्जत तालुक्यातील येसवडी या ठिकाणी आपल्या मूळ गावी येऊन त्यांच्या गावातील तब्बल संपूर्ण गावाला किराणा साहित्य भेट दिले त्यामध्ये तेल २ किलो, डाळ २ किलो, गुळ १ किलो, साखर २ किलो, चिवडा १ किलो, रवा २ किलो, बेसन पिट १ किलो, साबण, पूजेचे सामान, अगरबत्ती, मैदा, कोलगेट, खोबरं अर्धा किलो, उटणे, डालडा तूप २किलो असे साहित्य देण्यात आले.
यावेळी गावातील सर्व वृद्ध महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शरदभाऊ सोनवणे, बबनदादा सोनवणे, काळूराम सोनवणे, तुकाराम साळवे, शेखर बंगले, स्वराज पाटेकर, हरिश्चंद्र सोनवणे, स्वप्नील जाधव, गोरख कांबळे, ग्रामसेवक शेटे, सरपंच नितीन पिसे, नितीन शिंदे, शहाजी गायकवाड, राहुल शिंदे,उमेश भैलुमे, संदीप कांबळे, सुहास जगदाळे, अनिल थोरात, जयदीप पिसे, शहाजी गायकवाड, मच्छीन्द्र सोनवणे, राजू सोनवणे, प्रथमेश साळवे आदी उपस्थित होते गावातील नागरिकांच्या हस्ते सन्मान देखील नाना यांचा करण्यात आला.तसेच, या स्थुत्य उपक्रमाचे आयोजन श्री. कुंडलिक नाना सोनवणे, प्रविण सोनवणे यांनी केले. त्यामुळे या कार्यक्रमाला एक आगळेवेगळे स्वरूप लाभले.
स्रोत:(पत्रकार दादासाहेब सोनवणे यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)
