दिनांक २० जानेवारी २०२४, श्रीगोंदा:
कोळगाव विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन जयसिंगराव लगड उर्फ आप्पा यांचे दुःखद निधन झाले. आज २० जानेवारी रोजी त्यांचा दशक्रिया विधी होता. आप्पांनी कोळगाव विविध कार्यकारी सोसायटीचे सलग पंधरा वर्ष चेअरमन या पदावर काम केले होते. यामुळे अनेक गोरगरीब गरजू लोकांचे सोसायटीच्या माध्यमातून संसार उभे केले होते. आप्पांच्या जाण्याने कोळगाव पंचक्रोशीतील सर्वच लोक,हळहळव्यक्त करत आहेत.
आप्पांचा सर्वच सामाजिक कामात सहभाग होता. दशक्रिया विधीसाठी कोळगाव ग्रामस्थांसह पंचक्रोशीचे अनेक मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात आप्पांच्या स्मरणार्थ लगड सरदार कुटुंबियांनी कोळगाव येथील जनतेची सेवा म्हणून व खरी गरज ओळखून स्मशानभूमीमध्ये मोठा मंडप बांधून दिलेला आहे. यातूनच आप्पा कायमच यातून कोळगावकरांच्या स्मरणात राहतील. आज दशक्रिया विधी नंतर अनेक मान्यवरांच्या हस्ते स्मशानभूमी मंडपाचे लोकअर्पण झाले.
यावेळी शिरूर तालुक्याचे माजी आमदार सूर्यकांत जी पलांडे, पुणे जिल्हा भाजप नेत्या जयश्रीताई पलांडे, श्रीगोंदा तालुक्याचे नेते घनश्याम आण्णा शेलार, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे, श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार राहुल जगताप पाटील, कोळगाव विविध कार्यकारी सोसायटीचे आजी/माझी चेअरमन, सदस्य, कोळगाव ग्रामपंचायतचे आजी/माजी सरपंच, उपसरपंच त्याचप्रमाणे कोळगाव ग्रामस्थ व पंचक्रोशीतील लोक उपस्थित होते.
आप्पांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी आहे. आप्पांचा एक मुलगा प्रगतशील शेतकरी आहे.. एक मुलगा शेतकरी आहे.. एक मुलगा कॉसमॉस बँकेमध्ये उच्च पदावर आहे आणि श्रीगोंदा तालुका पंचायत समितीचे माजी सभापती व कोळगाव गावचे लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम जी लगड यांचे ते चुलते होत. मान्यवरांचे ऋण लगड सरदार कुटुंबीयांतर्फे सचिन सर लगड यांनी मानले.
स्त्रोत:(मच्छिंद्र सुद्रिक)
