श्रीगोंद्यात अस्तित्व फाऊंडेशन मार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी.
01 mins
श्रीगोंद्यात अस्तित्व फाऊंडेशन मार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी.
दिनांक २४ फेब्रुवारी श्रीगोंदा:
श्रीगोंदयात अस्तित्व फाउंडेशन च्या वतीने मजूर व कामागारांना नास्ता देऊन शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली आहे.
श्रीगोंदा -पारगाव रोडचे काम चालु आहे.या कामावर गोर,गरिब मजुर उन्हा – तान्हात काम करतात , सण असो कि इतर काही काम असो पण हे मजुर आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी कष्टाची काम करत आसतात.या मजुरांना कुठे तरी मानसन्मान मिळावा या हेतुने,अस्तित्व फाऊंडेशनचे मार्गदर्शक नवनाथ दरेकर,सुभाष जगताप,गोरख (बंडु) डाके,संतोष पांढरकर,विजय खेतमाळीस,मोरे(साहेब साईट) सुपरव्हाजर व सर्व मजुर वर्ग उपस्थित होते.
यावेळेस मजुरांना नाष्टा देऊन,त्यांना सन्मानीत करण्यात आले.यावेळी,बोलताना अस्तित्व फाऊंडेशन चे अध्यक्ष गोरख आळेकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपले स्वराज्य हे मावळे व रयतेच्या सहकार्याने उभारले आहे.महाराजांनी प्रथमतः रयतेचे कल्याण कसे होईल याचा विचार नेहमी करत असत.आज याच विचाराने प्रेरित होऊन या गोर गरिब मजुरांत जाऊन त्यांचं दुःख समजुन घेत त्यांच्या समवेत शिवजयंती साजरी केली.