त्रिदल करिअर अकॅडमीचा उद्घाटन समारंभ संपन्न..

दिनांक १ जानेवारी, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागांत वास्तव्यास असणारे व सैन्यदलात आपले करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना येथेच सुविधा मिळावी, यासाठी मेजर उद्धव खामकर यांनी त्रिदल करिअर अकॅडमी नावाने अकॅडमी चालू केली आहे. त्याचा आज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन समारंभ संपन्न झाला. नवीन वर्षाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आज सायंकाळी पार पडला. या कार्यक्रमासाठी श्रीगोंदा तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.

https://bit.ly/bspmycityshrigonda

(जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष) बाबासाहेब भोस, (सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन) राजेंद्र नागवडे, (जिपचे माजी सदस्य) अनिल ठवाळ, (युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष) स्मितल भैय्या वाबळे, (तालुका वैद्यकीय अधिकारी) डॉक्टर नितीन खामकर, (श्रीगोंदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी) मंगेश देवरे, (श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा) शुभांगी पोटे, (नगरसेवक) संतोष कोथिंबिरे, (नगरसेवक) सतिष मखरे, (शिवसेनेचे तालुकाध्यक्ष) बाळासाहेब दुतारे, पोकॉ संतोष कोपनर, (अग्निपंख फाउंडेशनचे) बाळासाहेब काकडे, (दक्ष फाउंडेशनचे) दत्ता जगताप, (संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष) अरविंद कापसे, (प्रहारचे) माधव बनसोडे, विनय खर्चे, सागर गोरे, (पत्रकार) बाळासाहेब काकडे, विशाल चव्हाण, योगेश चंदन, राजेंद्र राऊत, अमोल गव्हाणे, रमेश गांधी, Ad. प्रशांत गोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तर, अनेकांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीगोंदा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजूदादा गोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मेजर उद्धव खामकर यांच्या बाबतीत माहिती दिली. खामकरांनी ही अकॅडमी सुरू करण्यासाठी केलेला खडतर प्रवास गोरेंनी यावेळी उपस्थितांना सांगितला. मेजर खामकर व त्यांच्या पत्नी यांचा अकॅडमी सुरू करण्यामागे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लाभ मिळावा असा मानस आहे. मे. खामकर व त्यांच्या पत्नी यांनी या अकॅडमीचे स्वप्न पाहिले होते. आज ते साकारही झाले. मात्र, दुर्दैवाने काही दिवसांपूर्वी मेजर खामकर यांच्या पत्नीचा आकस्मित मृत्यू झाला. या दुर्घटनेबाबत विचार मंचावरील अनेकांनी हळहळ व्यक्त करीत, त्यांच्या अनुपस्थिती बद्दल दुःख व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुण्यनगरीचे पत्रकार विशाल चव्हाण यांनी केले. तर, Ad. प्रशांत गोरे यांनी अकॅडमीच्या सुरुवातीपासून उद्घाटनापर्यंतचा संपूर्ण प्रवास आणि त्यात आलेल्या अडचणी नमूद केल्या.

(नागवडे कारखान्याचे चेअरमन) राजेंद्र नागवडे व (जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष) बाबासाहेब भोस यांनी मेजर खामकर यांनी सुरू केलेल्या करियर अकॅडमीला शुभेच्छा दिल्या. याचबरोबर मिराताई शिंदे, अरविंद कापसे, बाळासाहेब काकडे, दत्ता जगताप यांनीही अकॅडमीच्या शुभारंभ कार्यक्रमात मेजर खामकर यांना सदिच्छा दिल्या. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी मल्लखांबची प्रात्यक्षिके दाखवली. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक, पत्रकार, सामाजिक, राजकीय, पोलीस, शैक्षणिक, सैन्य दलातील निवृत्त पदाधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन खामकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले व कार्यक्रम संपन्न झाला.

स्रोत:(उद्घाटन कार्यक्रम)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading