प्रजापिता सम्राट अशोक (भाग १३)..

जनसभेचे आयोजन (लोकांची मनं मोकळी झाली)

अशोकाने जनतेचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी या जनसभेचे आयोजन केले होते. या सभेत प्रथम श्रेष्ठी उभे राहिले. अशोकाची परवानगी घेतली आणि बोलायला सुरुवात केली. “आम्ही कोणाच्याही विरोधात नाही. आम्ही आमच्या मगधाचे सम्राट बिंदूसार यांच्याशी प्रामाणिक आहोत, अशी प्रथम ग्वाही देतो . आम्हाला आमच्या राजाचा अभिमान आहे. ते आमचे भूषण आहेत. ” ” परंतु या ठिकाणी जे प्रांतपती मेघवर्मा व सत्यसेन अनेकांवर अन्याय करतात, येथील सुंदर तरुणींचे पती होऊ पाहतात . त्यांनी आमचं जिण हराम केले आहे … आमच्या मुली बाळींना मोकळे पणाने जगता येत नाही . कोणी ही कोठे ही अत्याचार करावा .

https://bit.ly/bspmycityshrigonda

जगणचं यांनी कठीण करून ठेवल आहे. जे जे अधिकारी प्रजेला त्रास देतात त्यांची बिंगं बाहेर पडू लागली. तशी त्यांच्या मनाची घालमेल सुरू झाली . मेघवर्मा उभे राहिले आणि सैन्याला आदेश दिला. “ या अशा मूर्त्यांना चांगले फोडून काढा आणि अटक करून बंद करा अंधाऱ्या कोठडीत. “अशोकाने आपली नजर सर्वांवर फिरवली. कोणाची हिंमत झाली नाही पुढे येण्याची. मेघवर्मा व सत्यसेन यांना अशोकाने सुनावले. ” मी येथील प्रजेला अभय दिले आहे, याची जाण ठेवावी.” माझ्या परवानगी शिवाय येथे कोणाला ही हात लावता येणार नाही . पुढे बोलणं हरीहर यांनी चालू केलं . “ महाराज , आजपर्यंत आमचं गा – हाणं कोणीच ऐकून घेतलं नाही . तुम्हीच एक आहात की आम्हाला न्याय दिलात . सुसीम महाराजांनी आमचा एक शब्दही कधी ऐकून घेतला नाही . उलट या अधिकाऱ्यांमार्फत अन्याय करून अनेकांना बंदिखान्यात टाकले . त्यामुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले …. ” ”

अनेक मुलींच जीवन बरबाद केले या लोकांनी ” . सहदेवची मुलगी उज्वला बोलण्यासाठी उभी राहिली . तेव्हा मेघवर्माच्या अंगाची आग – आग झाली . तो म्हणाला , “ ही कुलहीन लंपट स्त्री . महाराज , सुसीम युवराजांवर घाणेरडे आरोप करण्यासाठी उभी आहे . सैनिकांनो , खेचा तिला आणि … ” खबरदार कोणी पुढे यालं तरं , आपली नजर रोखत अशोक म्हणाला “ प्रांतपती , ही सभा लोककल्याप्पाची आहे . त्यांना बोलण्याची पूर्ण मुभा देण्यात आली आहे . त्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी ही सभा आहे . मौर्यकुलाची प्रतिष्ठा सांभाळण्यास मी समर्थ आहे . आपण त्याची काळजी करू नये . मी स्वतः त्यासाठी येथे हजर आहे , आपण काळजी करू नये ” . सातत्याने लोकांवर गडगडणारा मेघवर्मा पार गारठला. अशोकापुढे आपले काही चालत नाही हे त्याने ओळखले आणि बाकी अधिकाऱ्यांचा चेहरा तर पाहण्यासारखा झाला . अनेकांनी आपली कथा अन व्यथा मांडली . कित्येक शेतकऱ्यांच्या जमिनी एकही कर्षापन न देता फुकटात लाटल्या होत्या. त्या जागेवर मोठे मोठे महाल अधिकारी वर्गाने बांधले होते . अनेकांना चाबकाच्या फटका – यांनी फटकारले होते . एक ना अनेक गोष्टी घडल्या होत्या . शेतकरी मात्र भिकेला लागला होता .

“ सहदेव तू सैन्याचा म्होरक्या होता म्हणून सर्व सैन्याला वेठीस धरून त्रास दिला हे खरे का ? ” अशोकाने विचारताच अंगात त्राण नसतानाही उभं राहण्याचा सहदेवने प्रयत्न करताच त्याला बसून बोलण्याची परवानगी देण्यात आली . अशोकाने सहदेवला निर्भयपणे आपले विचार माडण्याचा आदेश दिला . सहदेव बोलू लागला . ” कुमार महाराज , आम्ही कोणीही शासनाच्या विरूद्ध नाही किंवा नव्हतो . आम्हाला मात्र सुसीमकुमारांच्या राज्यात न्याय मिळाला नाही. मी मूर्तीकार. अनेक सुंदर सुंदर मूर्त्या मी बनवल्या . त्या मूर्त्या या अधिकाऱ्यांनी लुटल्या. आजही त्यांच्याकडे सापडतील . आता एकच चालतीबोलती जिवंत मूर्ती आहे . तिलाही लुटण्याचा व माणसातून उठवण्याचा प्रयत्न केला गेला . तसा कट रचला पण माझी उज्वला खंबीर , तळपणारी कट्यार आहे . म्हणून ती त्यांच्या हातातून वाचली …. “अशोकाने सतर्क राहण्याचा आदेश देऊनही सैनिकांची नजर चुकवून एक बाण आला आणि सहदेवाच्या शरीरात घुसला . लगेच अशोकाने बाण मारणा – या जयंत वर्मा याच्या हातात बेड्या ठोकण्याचा आदेश दिला आणि सहदेव याला ज्या अंधारकोठडीत ठेवण्यात आले होते त्या जागी त्याची रवानगी करण्यात आली . अशोक कर्तव्यपालन करणारा शासक म्हणून लोकांना प्रिय झाला . अशोकाच्या नावाने लोकांनी घोषणा दिल्या . लोकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले तर अधिका – यांवर फार मोठा वचक बसला . एवढेच नाही तर रात्रीच राजीनामा देऊन मेघवर्मा तेथून निघून गेला. अशीच एक सुखद सकाळ. अशोक आपल्या घोड्यावर बसून एका चैत्य स्तूपाचे सौंदर्य न्याहाळत होता .

त्याच वेळी उज्वलाही आपल्या घोड्यावरून तेथे आली . दोघे फिरत फिरत एका तळ्याजवळ येऊन बसले . तेव्हा उज्वला म्हणाली , ” त्या दिवशी काही गोष्टी बोलता आल्या नाहीत . ” ” मग आता बोल अगदी मनमोकळेपमाने . ” “ महाराज , एका रात्री सुसीमच्या आदेशावरून मला त्याच्या महालात कोंडून ठेवले आणि माझ्यावर अन्याय करण्याचा त्यांनी प्रयत्न केला . मी तोंड दाखवण्यालायक राहिले नसते . माझी इज्जत धुळीला मिळाली असती . पण माझी संरक्षण करणारी ही सखी होती म्हणून मी वाचले … ” म्हणत तिने तळपती कट्यार अशोकाच्या समोर धरली . ” ही कट्यार मी त्याच्या अंगावर उगारली तेव्हा तो पळून गेला . ” मागे वळून बघण्याची त्यानं हिम्मत केली नाही . “ वा ! छान . अशोकाने तिच्या धैर्याचं कौतुक केले . तिलाही समाधान वाटले . सुसीम पेक्षा अशोक कितीतरी पटीने चांगला होता . माणूसकीचा पाझर आणि मायचा ओलावा येथे होता . राजाच्या विरोधाचा विद्रोह शांत होत चालला होता .

एक दिवस अशोकाला धमकीचे पत्र आले. न्यायी मेघवर्मा यांच्यावर आपण कसा अन्याय केला ते लिहिले होते. म्हणजेच मेघवर्मा हा कलिंग राजा चैत्र ( खारवेल ) याच्या आश्रयास गेला . तेथे जाऊन त्याने मगध राज्याच्या विरोधात कारस्थाने सुरू केली. अशोकांनीही – आमच्या राज्यात कोणी नाक खुपसू नये. न्याय – अन्याय काय असतो हे आम्हाला कोणी शिकविण्याच्या फंदात पडू नये. आमच्या कार्याची आम्हाला चांगली जाणीव आहे , असे त्याला उत्तर पाठविले . सहदेवला खूपच त्रास होत आहे हे कळताच अशोक त्याची भेट घेण्यासाठी गेला असता सहदेव म्हणाला , ” उज्वला ही माझी मुलगी नसून माझ्या मित्राची मुलगी . त्याच्या मृत्युनंतर मीच तिचे पालनपोषण केले .

दुसरा कोणी आधारच नव्हता .आतापर्यंत मी तिचा सांभाळ केला . आता ती आपल्या हवाली करत आहे . ” म्हणून त्याने प्राण सोडला . अशोक हाच आता उज्वलाचा आधार ठरला. अशोकाने लोकांचे बंड, राज्याविरुद्ध पेटलेला विद्रोह तलवारीच्या किंवा शस्त्राच्या जोरावर नव्हे तर प्रेमाच्या व जिव्हाळ्याच्या शब्दाने शांत केला . त्यामुळे अधिक लोकप्रिय झाला . हे इतिहासातील एक आश्चर्य आहे . असा कोणी झाला नाही आणि पुढेही होणार नाही . बिंदूसाराने निरोप पाठवला आणि अशोकाला परत पाटलीपुत्राला बोलाविले . बिंदूसाराच्या आज्ञेप्रमाणे आपले कर्तव्य पार पाडून पाटलीपुत्रला परतला . इतकं करूनही बिंदूसाराने अशोकाचं कौतुक केले नाही की , पाठीवर कधी शाबासकीची थाप टाकली नाही .

उलट अशोकाला दोषी ठरवले . आपल्या वागण्याने अधिकारी वर्ग दुखावला गेला , मेघवर्मा कलिंगच्या आश्रयास गेला याचा ठपका अशोकावरच ठेवण्यात आला . आतापर्यंत चांगले काम करूनही अशोकाला अवमान सहन करावा लागत होता. त्यापैकी हा एक. आज्ञाधारक अशोक ताबडतोब आपले मोजके सैन्य घेऊन पाटलीपुत्रात दाखल झाला . अशोक जेव्हा पाटलीपुत्र नगरीत आला तेव्हा तेथील नगरवासीयांकडून भव्य स्वागत झाले. सुभद्रांगीदेवींना तर त्याच्या कर्तृत्त्वाचा खूपच आनंद झाला व अभिमान वाटला. परंतु पट्टमहिषी व बिंदूसार यांना आनंद झाला नाही आणि कौतुकही वाटले नाही . कौतुक तर लांबच उलट मनात एक प्रकारची भीतीच वाटत होती . साम्राज्याचा तो भावी सम्राट होईल की काय असेच त्यांना वाटत होते .

पाटलीपुत्र येथे अशोक काही दिवस राहिला . सर्वांच्या वर्तनाचे बारकाईने निरिक्षण केलं . हातात शस्त्र न धरता तक्षशीलाचे बंड अशोकाने मोडून काढले . याचे आश्चर्य सगळ्यांना वाटले . त्याच्या कार्याचा आनंद मातोश्री व जनता यांना झाला होता . परंतु पिताश्री व पट्टमहिषी यांनी अशोकाला जेवढे वेगळे पाडता येईल तेवढे वेगळी वागणूक दिली . अशोकाबद्दल त्यांना एक प्रकारची वेगळीच भिती होती . इतर भावंडापेक्षा हा शूर व कर्तृत्ववान आहे . इतर भावंडांना बाजूला सारून सम्राट बनेल असेच वाटत होते . म्हणून त्याला इतर भावंडांपेक्षा वेगळी वागणूक दिली जात होती . त्यामुळे तो उदास झाला . त्याला त्याची पत्नी विदिशा आणि मुलं महेंद्र व संघमित्राची आठवण झाली आणि त्याने आपल्या मोजक्या सैन्यासह सरळ विदिशानगरी गाठली . आपल्या पत्नी – मुलांसह तो उज्जैन येथे येऊन आपल्या राज्यशासनाचा कारभार पाहू लागला . खरतर अशोक अतिशय प्रेमळ होता . त्यात त्याला विदिशाची साथ होती . पत्नी व मुलांच्या सहवासात तो रमला होता . बिंदूसार महाराज यांना वृद्धत्वामुळे फार हालचाल करता येत नव्हती . सुसीम हा सर्वात मोठा मुलगाही जवळ नव्हता अशावेळी महाप्रतापी सम्राट बिंदूसार ” आजारी पडले . त्यांचा आजार दिवसेंदिवस वाढतच चालला . त्यावेळी सर्वात मोठा मुलगा जवळ नव्हता . तो काश्मीरमध्ये होता . तर अशोक उज्जैनीत होता . महामंत्री व अधिकारी यांना सुसीम हा राज्याचा सम्राट म्हणून नको होता . त्यांची ओढ अशोकाकडेच होती . सम्राट बिंदूसार खूपच आजारी आहेत.

राजकुमारांनी त्वरित पाटलीपुत्रास यावे असा निरोप पाठवला. निरोप मिळताच अशोक व त्याच्या निवडक लोकांची एक तात्पुरती बैठक झाली आणि मग तो पाटलीपुत्रला निघाला. राधागुप्त अगोदरच पाटलीपुत्रात दाखल झाले होते. या हालचालींवरून काहीतरी घडणार याची शंका विदिशाला आली होती . अशोकाने हत्ती , घोडे , सैन्य याची जमवाजमव केली. विदिशा व मुलांचा निरोप घेण्यासाठी विदिशाच्या महालात गेला. तेव्हा विदिशा म्हणाली, ” मलाही बरोबर घेऊन चला. मलाही महाराजांची सेवा करता येईल . ” ” ह्यावेळी शक्य नाही . मी एकट्यानंच जाणं योग्य ठरेल . तू आग्रह धरू नये . मी तुला महाराणी बनवूनच घेऊन जातो . ” ” नको, नको. मी उज्जैनीच्या राज्यपालाची राणी आहे . मला महाराणीपद नको . ” विदिशा काहीतरी घडणार म्हणून मनातून घाबरली होती . ती अशोकाला म्हणाली , “ तुम्ही जा . पण मला एक वचन हवंय . ” ” कोणतं ? ”

” तुमच्या हातून कोणतीही हिंसा अथवा रक्तपात घडणार नाही . त्याशिवाय तुम्हाला येथून मी जाऊ देणार नाही . ” तिच्या आग्रहाखातर अशोक म्हणाला , “ तसं काही होणार नाही . ती म्हणाली मला सिद्धार्थ तथागताचा शांतीचा संयम व सदाचाराचा धम्म आवडतो. ” ” आपल्या हातून वाईट काही घडणार नाही याची मला खात्री द्या . ” ” वा ! मी उत्तम राजा आहे . मी युद्धावर निघालो आहे आणि तुझा हा उपदेश ? हे बघ , आता मी निघालो आहे . महेंद्र आणि संघमित्राकडे लक्ष दे. ” म्हणून त्याने निरोप घेतला.

अशोकाचा घोडा भरदाव पाटलीपुत्र नगरीकडे झेपावला. रात्र चढायला लागली होती . क्षिप्रा नदीच्या शांत पात्रात केलेल्या दीपदानातील एक एक दिवा आता मालवत चालला होता . विदिशाच्या मनात पतीबद्दलची काळजी वाढत चालली . त्यांच्या हातून काय घडेल याची कल्पनाही करवत नव्हती . आपल्या मुलांना ती कुरवाळत होती . तिच्या मनाची अवस्था यावेळी थोडी अस्वस्थ जाणवत होती . अशोक विनाविलंब पाटलीपुत्र नगरीत येऊन हजर झाला . बिंदूसारांचा अंतिम क्षण जवळ आला होता . सुसीमला त्यांची नजर शोधत होती . मृत्यूपूर्वी राजमुकुट त्याच्या डोक्यावर चढवायचा होता . पण तो कोठेही दिसत नव्हता . मात्र अशोक तेथे येऊन दाखल झाला होता . भिरभिरत्या नजरेने बिंदूसारांनी अशोकाला पाहून त्याला जवळ बोलाविले . त्याला आपला उत्तराधिकारी नेमून त्याच्या डोक्यावर राजमुकुट चढविला . इ . सनापूर्वी २७३ मध्ये मौर्य साम्राज्याचा सम्राट अशोकाला म्हणून जाहिर करण्यात आले आणि सम्राट बिंदूसारांची प्राणज्योत मालवली . अशोकाच्या शक्तीसामर्थ्यावर सर्वांचा विश्वास होता .

अशोक सम्राट झाल्याबद्दल राज्यातील लोकांनाही खूप आनंद झाला . ही बातमी सुसीमला कळली तेव्हा आपले सैन्य घेऊन तो पाटलीपुत्रकडे निघाला . तेव्हा राधागुप्ताने निरोप पाठवला – तुला अशोकाचा पराभव करावा लागेल तरच राज्य घेता येईल . अन्यथा नाही . माझा सम्राट होण्य असताना अशोक सम्राट कसा झाला . याचा त्याला राग आला . आणि अशोकावर चाल करून आला . खरं पाहिलं तर सुसीम कसा होता हे सर्वांना माहीत होते . साधं तक्षशिलेचं बंड मोडता आले नाही . तो या साम्राज्याचा कारभार करणार कसा ? अशी लोकांची धारणा झाली होती . राज्यकारभारापेक्षा त्याला नाच गाण्यातच जास्त रस होता . सुसीम काश्मीरहून पाटलीपुत्र येथे दाखल झाला तेव्हा अशोकची आणि सुसीमची पाटलीपुत्रच्या प्रवेशद्वारातच लढाई सुरू झाली . पाटलीपुत्र , उज्जैन , तक्षशिला , सर्व सैन्य व जनता अशोकाच्या बाजूंनी होती. सुसीम मारला गेला. त्याच्यासोबत असणारे सुसीमचे बंधू सुनंद, सुमेध, बुद्धिधर, जयंत हेही मारले गेले . युद्ध संपल्यानंतर अशोकाला फारच दुःख झाले . “ मी सत्येच्या मोहापुढे हे काय करून बसलो. मी माझ्याच नात्याचे , माझ्याच बांधवांचे रक्त सांडले . माझी विदिशा बोलली ते खरंच होतं . पण आता काय करणार ? ….

https://bit.ly/bspmycityshrigonda

“त्यातून राधागुप्तांनी राजनीतीचे तत्त्व सांगून अशोकाला सावरण्याचा प्रयत्न केला. खरतर खंदकावरून उडी मारताना सुसीम पेटलेल्या ज्वालामध्ये पडला असे ही सांगितले जाते. ही व्यवस्था मंत्र्यांनीच केली असे म्हटले जाते .

क्रमशः
स्रोत:(श्रीनिवास भालेराव यांच्या प्रजापिता सम्राट अशोक या पुस्तकातुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading