दिनांक २ जानेवारी, श्रीगोंदा:
ऑपरेशन मुस्कान २०२० अंतर्गत घेण्यात आलेल्या विशेष मोहिमे दरम्यान पोलीस स्टेशन श्रीगोंदा यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक जिल्हा अहमदनगर यांचे वतीने पोलीस निरीक्षक रामराव ढिकले व ऑपरेशन मुस्कान पथकाचे सपोनि गजानन पाटील, पोकॉ किरण बोराडे, मपोकॉ लाड व पुराणे यांचे प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन व कौतुक करण्यात आले आहे.

ऑपरेशन मुस्कान मध्ये बेपत्ता व्यक्तींच्या शोधासाठी काम केलेल्या पोलीस स्टेशनच्या सर्व बीट अंमलदार व इतर अंमलदारांचे अधीक्षकांनी अभिनंदन केले आहे.
स्रोत:(पोकॉ संतोष कोपनर)
