प्रजापिता सम्राट अशोक (भाग १४).

सम्राट झाल्यानंतर

अशोक मयूर महालाच्या पायऱ्या उतरत असताना गत इतिहास त्याच्या डोळ्यापुढून सरकत होता . पट्टमहिषीच्या महालाजवळचा दीप सायंकाळ झाली तरीही पेटला नव्हता. फक्त हुंदक्यांचा आवाज येत होता . अशोक त्या महालापासून जात असताना पट्टमहिषी झटपट पाय – या उतरून खाली आल्या आणि म्हणाल्या, ” थांबा सम्राट, … ” ती मुलाच्या (सुसीमदादाच्या ) मृत्यूच्या दुःखाने व्याकूळ झाली होती. रडून रडून डोळे लाल झाले होते . चेहरा कोमेजला होता.

https://bit.ly/bspmycityshrigonda

दीनवाणी दिसत होती . तरी तिच्या शब्दातील कठोरता व व्याकुळता सहज जाणवत होती . डोळ्यातील ज्वाला धगधगत होत्या . ती ओरडली , ” बोला सम्राट , पाझा मुलगा ठार केलात . त्याची गर्भवती पत्नी शिलावती कधी आणि कोठे निघून गेली . ( पुढे खरं तर एका जीवलग सेविकेने गुप्त दारातून तिला तेथून बाहेर काढले होते . त्यानंतर ती कोठे गेली कोणालाच पत्ता लागला नव्हता . ) “ माझी लाडकी सून आणि तुमची भावजय सुसीमचा वाढणारा अंकुर पोटात घेऊन कोठे गेली , तिचे काय झाले समजायला मार्गच उरला नाही . मी येथे क्षणभरदेखील राहणार नाही .

” ” नाही माते , मी तुझाच मुलगा आहे . माते , तुझा हा मुलगा सर्व व्यवस्था पाहील . ” सुसीम दादाला मारण्याचा माझा मुळीच हेतू नव्हता . ” माझे आई – बाबा अजून आहेत . मी हिमालीला जात आहे . आज्ञा असावी सम्राट . ” अशोकाला गहिवरून आले . ‘ मी हे काय केले ? नको . नको मला ती सत्ता आणि सिंहासन . हा अवमान , ही निर्भत्सना , शिव्याशाप …. अशोकाचं मन सैरभैर झालं . तशा अवस्थेत मातोश्रीच्या महालात प्रवेश करताच सुभद्रांगी मातेने त्याला मिठी मारली . डोक्यावरून हात फिरवला. तिच्या डोळ्यांतील अश्रू अशोकाच्या डोक्यावर पडले. तिने विचारले, “ महाराणी तुला खूप टाकून बोलल्या का ? ” आईच्या मायेने अशोकाचा मनस्ताप कमी झाला . जरा बरं वाटलं .

” माते , या माझ्या सम्राटपदाचा तुला राग तर आला नाही ना ? ” ” राग आणि तो का ? अरे , नियती आपल्या योजनेप्रमाणे ते घडवत असते . ” मातोश्रीने नातवांचा विषय काढला त्या म्हणाल्या ” त्यांना घेऊन ये . मला त्यांना व माझ्या सुनेला पाहण्याची फार इच्छा आहे . माझी सून फारच शहाणी आहे . मी आत्तापर्यंत फक्त ऐकत आले . पाहिले मात्र नाही . तिला पाहण्याची खूप इच्छा आहे . ” अशोकाला विदिशाचे बोल आठवले . महेंद्र आठवला , संघमित्रा आठवली . तेव्हा काळजात चर्र झालं . कारण शिलावतीवहिनी पोटात वाढणारा अंकुर घेऊन कोठे गेली असेल , तिने आपल्या जिवाचं …. नको , नको असा विचारही नको .

त्याने शिलादेवींचा शोध घेतला पण ती कोठेही सापडली नाही . अशोकाने सुब्रह्मण्य यांना आज्ञा केली – ” तुम्ही उज्जैनीला जाऊन विदिशाला आणि माझ्या मुलांना घेऊन या . तुम्हाला लागणा – या सर्व गोष्टी बरोबर घ्या . सहदेव , ज्ञानेश्वर व तिष्याने अशोकाला पहताच हात जोडून अभिवादन केले . त्यांच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता . बंधू तिष्य निर्विकार व संयमान उभा होता . ” अरे ! तुम्ही असे दूरच उभे का ? तिष्यदादा, तुझा हा लहान बंधू इतका वाईट , अविचारी आहे का ? मी तुमच्या सर्वांचा फार अपराधी आहे. दादा, असे हात नको जोडू. मला, समजून घ्या. ” तिष्यदादाने धावत जाऊन अशोकाला मिठी मारली . आणि दोघाही बंधूंच्या डोळ्यात अश्रू तरळले . ” हे आपल्या घरात घडायला नको होते . ” तिष्य समजावण्याच्या स्वरात म्हणाला ” खरं आहे पण हे घडले . ” ” दादा , मी बेभान होऊन लढत होतो. मी माझ्या इतर बंधवांना पाहत होतो. पण सुसीमदादाशिवाय कोणी दिसत नव्हते.

सत्तेच्या सिंहासनाशिवाय मला काही दिसलेच नाही . आम्ही दोघे भाऊ गंगेच्या किना – यावर लढत होतो . रक्ताने गंगातट लाल झाला होता . अग्नी पेटलेल्या खंदकात अनेक वीर पडले . सुसीमदादा माघार घेत असताना त्याचा तोल गेला आणि …. ” तिष्य अशोकाचे सांत्वन करत होता . सर्व भावांची तुटलेली डोकी , छिन्नविच्छिन्न विखुरलेला देह या गोष्टी सतत अशोकाला दिसत होत्या. आपल्याकडून हे घडायला नको होते याची जाणीव त्याला बोचत होती. सुब्रह्मण्य उज्जैनीत गेला तेव्हा विदिशाला खूप बरं वाटलं. त्यांचे स्वागत चांगले झाले .

अशोकाने केलेली कामगिरी अगोदर विदिशाला कळाली होती. थोडे दिवस राहिल्यानंतर , ” आपणा सर्वांनाच घेऊन येण्याचा सम्राटाचा आदेश आहे . ” विदिशा म्हणाली ” हो, ठीक आहे , पण मला येता येणार नाही . माझा रस्ता वेगळा, त्यांचा रस्ता वेगळा आहे. मी बौद्ध धम्माच्या आचार- विचारांची . आपल्या रक्तामांसाच्या , नात्याची ही हिंसा मला अजिबात मान्य नाही . मी थेरी संघात भिक्खूनी म्हणून जात आहे . महेंद्र आणि संघमित्रा यांना आपण घेऊन जाऊ शकता. ” संघमित्रा आणि महेंद्र हे संगळ शांतपणे एकत होते. सुब्रह्मण्य याने तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला . पण विदिशात काही बदल झाला नाही . ती आपल्या मतावर ठाम होती . तिने दोन्ही मुलांना पाटलीपुत्राला पाठवले आणि स्वतः थेरी भिक्खूनी संघात प्रवेश केला .

” बुद्धं सरणं गच्छामि… धम्म सरणं गच्छामि… संघं सरणं गच्छामि..

“सुब्रह्मण्य महेंद्र व संघमित्राला घेऊन पाटलीपुत्रात आल्याची बातमी अशोकाला कळली . त्याला खूप आनंद झाला . पल्ली विदिशा, मुले महेंद्र आणि संघमित्रा यांना केव्हा भेटू असे त्याला झाले होते. सुभद्रांगी तर आपल्या नातवाना व सुनेला पाहण्यास आतूर झाली होती . तेवढ्यात सुब्रह्मण्य यांनी महेंद्र व संघमित्रा यांना घेऊन प्रवेश केला. अशोकाने त्यांना कडकडून मिठी मारली. आजीने आपल्या नातवाना छातीशी कवटाळले . कितीतरी वेळ त्यांना तसं धरून डोळे मिटून होत्या. नंतर त्यांना आपल्या मांडीवरच बसवून त्यांचे कौतुक केले . त्या पुन्हा पुन्हा त्यांना गळ्याला लावत होत्या . त्यांचा आनंद शब्दात व्यक्तही करता येत नव्हता.

अशोकाने विचारले , ” अरे , माझी विदिशा कोठे आहे ? ” या प्रश्नाचे उत्तर कसे द्यायचे या विचारात सुब्रह्मण्य गप्पच होता. ” अरे बोल , विदिशा कोठे आहे ? ” ” त्या आल्या नाहीत. ” थेरी संघात त्यांनी प्रवेश केला . विदिशाने दिलेला निरोप कळताच अशोकाला फार वाईट वाटले – आपण या सिंहासनामुळे कशाकशाला पारखे होणार आहोत. खरोखर मी विदिशाचा गुन्हा केला तिला दिलेले वचन मी पाळले असते तर हिंसा झाली नसती. माझी विदिशा भिक्खूनी संघात गेली नसती. विदिशाच्या सहवासातघालवलेला काळ अशोकाच्या डोळ्यापुढून सरकत होता.

https://bit.ly/bspmycityshrigonda

सिंहासनासाठी मी काय काय गमावले, रक्ताची नाती ही तुटली . काळ कोणासाठी कधी थांबत नाही म्हणतात. अशोक मौर्य साम्राज्याचा सम्राट बनला तेव्हा अवघा २१ वर्षांचा होता. त्यानंतर चार वर्षे आपल्या विरोधातील लोकांना अमलाखाली आणले आणि आपली सत्ता प्रबळ केली . नंतर इ . स . पू . २६८ मध्ये राज्याभिषेक केला . आता अशोकाचा कोणी विरोधक उरला नाही असे वाटत होते . परंतु चंद्रगुप्ताच्या काळापासून कलिंगचे राज्य स्वतंत्र होते . राज्याभिषेकाकरता चार वर्षे का थांबला या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळाले नाही.

क्रमशः
स्रोत:(श्रीनिवास भालेराव यांच्या प्रजापिता सम्राट अशोक या पुस्तकातुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading