रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून इसमाची आत्महत्या..

दिनांक २ जानेवारी,श्रीगोंदा:

कृषी उत्पन बाजार समितीचे माजी उप सभापती व विद्यमान संचालक लक्ष्मणराव नलगे यांचे चिरंजीव दादासाहेब नलगे (वय ३५) यांनी स्वत:च्या रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.आज पहाटे दौंड च्या राहत्या घरी ही घटना घडली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही.

https://bit.ly/bspmycityshrigonda

लक्ष्मणराव नलगे यांना सुधीर व दादासाहेब ही दोन मुले असून, दादासाहेब हे दौंड येथील हॉटेल चा व्यवहार पाहत होते. मिळालेल्या माहितीनुसार दादासाहेब मागील काही दिवसांपासून तणावाखाली होते. मात्र, याचे कारण समजू शकले नाही. त्याच्या पश्चात मागे आई, वडील, पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.

स्रोत:(प्रसिद्ध माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading