दिनांक १६ जून, श्रीगोंदा:
आशा व गटप्रवर्तकांच्या विविध मागण्यांसाठी राज्य संघटना मार्फत पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला तालुक्यातील “अहमदनगर जिल्हा आशा कर्मचारी संघटने“च्या पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग दर्शविला. विविध मागण्यांचे निवेदन यावेळी तहसीलदारांना देण्यात आले.

प्रशासनास सादर करण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, महाराष्ट्र राज्यात ७२ हजार आशा व ४ हजार गटप्रवर्तक (बी.एम) राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत आहेत. माहितीचे संकलन व अहवाल सादरीकरण, लसीकरण, व्ही.एच. एन.एस.सी. सभा, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील बैठका ही सर्व कामे त्यांना करावी लागतात. याशिवाय विविध ७० कामावर आधारित मोबदला कोरोणा १९ पूर्वकाळात मिळत होता. ती रक्कम कामानुसार सरासरी २ हजार रुपये असते. परंतु, त्यां संबंधित काम दररोज ८ तास काम करावे लागते. त्यामुळे ती रक्कम मिळणे बंद झाले आहे.

गटप्रवर्तक या सुशिक्षित पदवीधर महिला असून, त्यांना सुमारे २५ आशा स्वयंसेविकांसाठी ठेवावे लागते. त्याकरता त्यांना दरमहा सुमारे ११ हजार ६२५ रुपये इतके मानधन मिळते. त्यातील रक्कम ग्राम भेटी देताना प्रवासापोटी खर्च होतात. त्यामुळे वस्तुतः कामाचा मोबदला फार कमी प्रमाणात मिळतो आहे. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आशा स्वयंसेविका यांचे वेळा वाचक असून, त्यांनी आपले घरदार सांभाळून आठवड्यातून चार दिवस काम करावे, तेही दोन ते तीन तास असावे असे सेवाधर्ती अटी मध्ये आहे. indefinite- strike- called- for-various- demands- participation- of-asha-and-group-promoters-in-shrigonda
२०११ पासून ग्रामीण व शहरी भागात आशा व गटप्रवर्तक यांचे प्राथमिक आरोग्य केंद्र, लसीकरण केंद्र व क्वारंटाईन कॅम्प येथे सकाळी पासून ८ तासांची ड्युटी लावली आहे. काही प्राथमिक आरोग्य केंद्रात तर आशांना घेऊन, टेस्ट करावी लागत होती. ती आता आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना देणेबाबत नुकताच हा आदेश आला आहे. असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी गट प्रवर्तकांना एन.एच.एम. कर्मचारी म्हणून आदेशित करावे, आशा गट प्रवर्तकांना किमान वेतन लागू करण्याचे आश्वासन कधी पूर्ण होणार, अशांना १८ हजार व गटप्रवर्तकांना २१ हजार पगार मिळावा, कामाचे दरमहा पाचशे रुपये मिळावे, शासकीय दर्जा देऊन पेन्शन व प्रा. फंडचा फायदा द्या. या आणि वरील नमूद मागण्यांच्या संदर्भात दिनांक १५ जूनपासून अहमदनगर जिल्हा आशा कर्मचारी संघटनेच्या माध्यमांतून महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघटना, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली बेमुदत संप सुरू करण्यात आला आहे. या आंदोलनात तालुक्यातील आशा व गटप्रवर्तकांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
स्त्रोत:(पवन रणदिवे)
