#श्रीगोंदा.. झहीर जकातेच्या जहिरी लिखाणावर कारवाईची मागणी..

दिनांक १५ जून, श्रीगोंदा:

भारतीय संविधानाविषयी अपशब्द व संविधान बदलण्याची समाजमाध्यमां (फेसबुक) वर लिखाण करणाऱ्या झहीर जकाते, श्रीगोंदा या इसमाच्या नमूद गैरलिखानाबाबत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनास काल दिलेल्या निवेदनात “ऑल इंडिया पँथर सेनेने” ही मागणी केली आहे.

सविस्तर माहिती अशी की, समाजमाध्यम (फेसबुक) वर झहीर जकाते, रा. श्रीगोंदा याने संविधान चिरकाल नाही. जर, संविधान एखाद्या समाजाच्या प्रगतीला आडवे येत असेल. तर, बदल अपेक्षित # support Maratha arakshan’ अशा पद्धतीने भारतीय संविधान विरोधी भूमिका मांडून भारत देशाच्या संविधानालाच विरोध दर्शविला आहे. या असंविधानिक लिखाणाचा ‘ऑल इंडिया पँथर सेने’च्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. श्रीगोंद्याचे (तहसीलदार) प्रदीप पवार व (पोलीस निरीक्षक) रामराव ढिकले यांना या विषयीचे निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे. shrigonda- demand- for- action- on- zaheer-jakates- poisonous- writing…

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, काहींना भारत देशाची कायदाव्यवस्था मान्य नाही. कारण, संविधान डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आहे. अनावश्यक व चुकीचे लिखाण करणाऱ्या या व्यक्तीने स्वतः देशद्रोही असल्याचे लिखित स्वरुपात स्पष्ट केले आहे. त्यामुळे सदर इसम हा संविधान विरोधी स्पष्ट होत आहे. या वक्तव्यामुळे भारतीय नागरिक तसेच, सविंधान प्रेमी व आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. नमूद झहीर जकाते याचा या जहिरी लिखाणाचा निषेध करीत, कायदेशीर कारवाईबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे. कारवाई न झाल्यास ‘ऑल इंडिया पँथर सेने’च्या माध्यमांतून पँथर स्टाईलने महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल. असा ईशारा जिल्हा उपाध्यक्ष अमर घोडके यांनी निवेदनातुन दिला आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

सदर निवेदन सादर करतांना अमर घोडके (अहमदनगर जिल्हाउपाध्यक्ष), पवन रणदिवे (तालुकाध्यक्ष), उत्तम पवार (तालुका युवाध्यक्ष), भूषण घाडगे (तालुका उपाध्यक्ष), अक्षय आठवले (तालुका संघटक) शुभम घोडके (शहराध्यक्ष श्रीगोंदा) सह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

स्रोत:(निवेदन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading