राजगृहावरील भ्याड हल्ल्याचा भारतीय बौध्द महासभेच्या वतीने निषेध..

दिनांक १४ जुलै,श्रीगोंदा:

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृह’वर दिनांक ०७ जुलै रोजी सायंकाळी अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहे. घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. आंबेडकरी अनुयायांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. तेव्हा या प्रकरणात असलेले आरोपी आणि त्यामागे असणाऱ्या प्रवृत्ती यांचा जातीय दंगली घडविण्याचा, आंबेडकरी अनुयायांची अस्मिता दुखावून त्यांना आंदोलन करण्यासाठी प्रवृत्त करून्याचा व कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा उद्देश दिसून येत आहे.

सर्व आरोपी आणि त्यामागील विघातक शक्ती यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी. या निषेधाचे निवेदन. मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालयात मेल द्वारे पाठविण्यात आले आहे. या निवेदनावर (जिल्हा सचिव) सतिश ओहोळ, (तालुका अध्यक्ष) प्रशांत चव्हाण, (सरचिटणीस) पंडीत कांबळे, (कोशाध्यक्ष) राजू ओहोळ आदिच्या सह्या आहेत.

(स्रोत:सतीश ओहोळ यांनी दिलेले निवेदन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading