दिनांक १४ ऑक्टोबर,श्रीगोंदा:
दि कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ ख्राईस्ट इन वेस्टर्न इंडिया पी. टी. आर. न. एफ. १७९ अहमदनगर या न्यासाची मौजे. श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा जि.अहमदनगर येथील नगरपालिका हदीतील गट नं. १७४९ क्षेत्र १०हे.९२ आर. जागा जमिनी मिळकत न्यासाच्या मालकीच्या आसून, संस्था विश्वस्ताबाबत मा.धर्मदाय आयुक्त अहमदनगर या ठिकाणी सन २००४ पासून ते आजपर्यंत वाद प्रलंबित आहेत.
अनेक मिळकती बाबत देखील न्यायालयात खटले चालू आहेत. मा. धर्मदाय आयुक्त अहमदनगर यांचे माहिती अधिकारात मागितलेले कार्यालयाच्या पत्रामध्ये विश्वस्ताबाबत (Change Report) बदल अर्ज प्रलंबित आहेत. असे स्पष्ट नमूद केलेले आहे. परंतु, काही तथाकथीत स्वयंघोषित लोक स्व:ताला संस्था विश्वस्त असल्याचे भासवून, सदर मिळकती बाबत कोणताही अधिकार नसताना न्यासाच्या मिळकती बाबत श्रीगोंदा ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर येथील धनदांडग्या ठेकेदाराला विक्री, हस्तांतरण, करार, नोटरी, करण्यासाठी घाट घालत असल्याचे समजले असून, असे निदर्शनास आल्यास मिळकती लिहून घेणार व देणार यांच्यावर ख्रिस्ती सामाज्याचा वतीने फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. असे प्रसिद्धीपत्र ख्रिश्चन समाज बांधवांच्या वतीने देण्यात आले आहे.
समाजाच्या याबाबत तीव्र व संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. असे ख्रिस्ती सामाज्याचे सामाजिक कार्यकर्ते भालेराव सतीश डॅनियल यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
स्रोत:(सतीश डॅनियल भालेराव यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)
