उस आणि फळबागांचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या लोणीव्यंकनाथ गावात किसन लक्ष्मण छत्रेया शेतकऱ्यांने माळरानावर निवडुंग वर्णीय ड्रॅगन फूडची लागवड केली. अतिशय कमी पाण्यावर हे पिक यशस्वी झाले. असुन, छत्रे परिवाराला एकरी सुमारे चार लाखाचे वार्षिक उत्पन्न या पिकातून मिळत आहे. त्यामुळे छत्रे परिवाराने शेतीत नवा पॅटर्न तयार केला आहे. किसन छत्रे यांना बाबासाहेब हा भाऊ सहा महिन्यापुर्वी वारले. शेतीचा भार या बंधूंवर आला. किसन यांची पत्नी शोभा प्रसाद वैष्णवी व वसुंधरा ही तीन मुले असा परिवार आहे.
किसन यांनी एक एकर माळरान क्षेत्रात चर खोदले आणि १०x११ फुट अंतरावर ४०० सिमेंटचे खांब रोवले. एका खांबांभोवती चार ड्रॅगन फुडचे रोपे या लागवडीस सुमारे दीड लाखाचा खर्च आला. लागवडीच्या वेळी अथवा रासायनिक खते व औषधे न वापरता हे पीक येते. ठिबक सिंचन आठ दिवसातुन एक तासभर पाणी सोडणे आवश्यक असते.
ड्रॅगन फुडचा झाडाला सुमारे १०० गॅम वजनाची फळे येतात. या फळाची चव स्टॉबेरी, पेरू सारखी हे पुर्ण पणे जैविक असते. त्यामुळे आरोग्यास उपायकारक असते त्यामुळे शहरी भागातून या फळांना मोठी मागणी होऊ लागली आहे.
ड्रॅगन फूडच्या झाडाला जून ते सप्टेंबर दरम्यान फळे होतात. हे फळे तयार करण्यासाठी एकरी अवघा हजाराचा खर्च आहे. आणि ही किमया कमी शिकलेले किसन छत्रे यांनी साध्य करून दाखविली आहे.
आयुर्वेदिक गुणकार्य
हे फळ बाहेरून गुलाबी रंगाचे असुन, आतमध्ये पांढऱ्या रंगाचा गर निघतो. कॅन्सर, डायबेटिस, हृदयविकार, सांधेदुखी, गुडखेदुखी, पांढऱ्यापेशी विणे यावर हे प्रभावी गुणकारी असुन, डॉक्टर हे फळ खाण्याचा सल्ला देत आहेत.
ड्रॅगन फुडची रोपवाटिका
ड्रॅगन फुडच्या झाडाला अतिरिक्त फुटवे निघतात. या फुटव्यांची किसन छत्रे यांनी रोपवाटीका तयार केली आहे. या रोपवाटीकतुन छत्रे यांना अतिरिक्त उत्पन्न सुरू झाले आहे. या रोपांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढू लागली आहे.
संदेश
सध्या पाणी हा भीषण प्रश्न आहे. दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न भीषण होत जाणार आहे. राजकिय नेत्यांच्या नावाने खड्डे फोडत बसून वेळ घालविण्यापेक्षा, कमी पाण्यावर येणारी पिक घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपण ड्रॅगन फुडची लागवड केली. लोकांनी सुरूवातीला नावे ठेवली. पण, आता तेच लोक कौतुक करतात. भविष्यात खजुर लागवड करण्याचा विचार चालू आहे. कारण, आपणाकडे हवामान बदलत आहे. त्यानुसार शेती करणे गरजेचे झाले आहे.:किसन छत्रे.
स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन),प्रस्तुत माहिती पुस्तक प्रकाशन वेळेची आहे.
