महिलेशी अश्लील वर्तन करणाऱ्या इसमास महिलांकडून चोप.. पकडून पोलिसांच्या केले स्वाधीन..

दिनांक २१ मार्च (श्रीगोंदा):

शहरातील गणपती मळा या ठिकाणीचा रहिवासी असलेल्या एका इसमास शेतात काम करत असलेल्या महिलेशी अश्लील वर्तन करून तिला पैशाचे आमिष दाखवत, वाईट भावनेने तिच्याशी वार्तालाप केला. महिलेने आरडाओरडा केल्याने आसपासच्या महिला व शेतकऱ्यांनी जमा होऊन नमूद इसमास चांगलाच चोप दिला. विशेष त्यास महिलांनी पकडून थेट पोलिसांच्या ताब्यात दिले. सदर घटना दिनांक १५ मार्च रोजी ११:०० वाजता घडली.

https://bit.ly/bspmycityshrigonda

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गणपती मळा, श्रीगोंदा येथील रहिवासी बबन चिमाजी दांडेकर या इसमाने शेतामध्ये काम करत असलेल्या एका तीस वर्षीय महिलेला अचानक पाठीमागे जाऊन मिठी मारली, तिच्याशी अश्लील वर्तन करू लागला, त्या महिलेला लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीने वार्तालाप करत असतांना, तू माझ्यासोबत चल असे म्हणत त्या महिलेला छेडू लागला. महिलेने त्याची मीठी सोडण्याचा प्रयत्न केला. तू जर माझ्यासोबत आली नाही ! तर, तुला मारील म्हणाला. त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी महिलेने आरडाओरडा केला. यावर आजूबाजूला शेतात काम करणाऱ्यां महिला व पुरुषांनी घटनास्थळी धाव घेतल्याने बबन दांडेकर तिथून पळाला. यानंतर घाबरलेल्या महिलेने सदरील घडलेला प्रकार घरी सांगितल्यावर नमूद प्रकरणी बबन दांडेकर विरोधात भादवि कलम ३५४, ३५४(अ) व ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

अशाप्रकारे महिलेशी अश्लील कृत्य करणाऱ्या बबन दांडेकरला गणपती मळा व दांडेकर मळा येथील महिलांनी पकडून थेट पोलीस स्टेशनला पोलिसांच्या स्वाधीन केले. या इसमामुळे परिसरातील महिला व लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेबाबत आसपासच्या लोकांनी सांगितले आहे. सदरील इसम हा एका नामांकित वकीलांनी स्थापन केलेल्या “फुले-आंबेडकर विचार मंच”चा कार्यकर्ता असल्याचे समजते आहे. शिवाय यापूर्वीही अशा प्रकारच्या विविध घटना त्याच्याकडून घडल्याचे स्थानिकांकडून समजते आहे. मात्र, इज्जत व भीतीपोटी कायद्याचा आधार घेण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. रूढावलेल्या या विकृत इसमाच्या कु.. कृत्याचा आलेख वाढत गेल्याने अखेर या प्रकरणाच्या निमित्ताने त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Man, who was behaving obscenely with a woman, was beaten by women .. caught and handed over to police ..

या विषयाच्या अनुषंगाने स्थानिक कार्यकर्ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटले असून, या इसमाच्या गैर वर्तनास खतपाणी घालणाऱ्या व त्याची पाठराखण करणाऱ्या त्या वकील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली असल्याचे समजले आहे.

स्रोत:(फिर्याद)

Leave a Reply