दिनांक २१ मार्च,श्रीगोंदा:
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास व्हावा व शिक्षणातून संशोधक घडावेत या उदात्त हेतूने राज्य स्तरावर डॉ. सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा घेतली जाते. नुकतेच डॉ. सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक वैज्ञानिक परीक्षेची राज्यस्तरीय गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली.

या परीक्षेमध्ये विद्यालयातील चार विद्यार्थ्यांच्या राज्य पातळीवर निवड झाली. शिंदे धैर्यशील बाळू व वाळके शंकर नितीन हे विद्यार्थी राज्यात प्रथम आले. तर, पाडळे तन्मय प्रदीप व डोले उज्ज्वल दीपक यांनी तिसरा क्रमांक मिळवला आणि जिल्हा स्तरावर अवधूत विजय सोनवणे यश संपादन केले.
विज्ञान शिक्षक श्री. संजय बर्डे, श्री. विलास दरेकर, श्री. दत्तात्रेय मोरे, श्री. अमोल डोईफोडे, विभाग प्रमुख श्री. शिवाजी थिटे यांनी मार्गदर्शन केले.
Success in Mahadji Shinde Vidyalaya’s Child Science Examination
यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र तसेच वैज्ञानिक कीट मिळणार आहे. या विद्यार्थ्यांचे (प्राचार्य) नवनाथ बोडखे, (उपप्राचार्य) बाळासाहेब जाधव, (पर्यवेक्षक) उत्तम बुधवंत तसेच, (मॅनेजिंग कौन्सिल सदस्य) बाबासाहेब भोस, (स्थानिक स्कूल कमिटीचे) प्रा.तुकाराम दरेकर, रवी दंडनाईक यांनी अभिनंदन केले.
स्रोत:(सचिन झगडे सर,श्रीगोंदा)
